अखेर सुटला कोविड रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा तिढा...नेमके काय घडले? 

corona patient 123.jpg
corona patient 123.jpg

नाशिक / मालेगाव : कोविड रुग्णालयांना ऑक्‍सिजन गॅसपुरवठा करणाऱ्या इंदूर गॅस एजन्सीचे संचालक भरत मेहता यांची एकमेव संस्था आहे. संस्थेच्या गुदामावर 21 मे आणि 23 मेस दुपारी साडेतीनच्या सुमारास काही नागरिकांनी येऊन गोंधळ घालत धमक्‍या दिल्या..अन् मग...
 

असा घडला प्रकार
कोविड रुग्णालयांना ऑक्‍सिजन गॅसपुरवठा करणाऱ्या इंदूर गॅस एजन्सीचे संचालक भरत मेहता यांची एकमेव संस्था आहे. संस्थेच्या गुदामावर 21 मे आणि 23 मेस दुपारी साडेतीनच्या सुमारास काही नागरिकांनी येऊन गोंधळ घालत धमक्‍या दिल्या. या प्रकारामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले असून, मी यापुढे ऑक्‍सिजन गॅसपुरवठा करू शकत नाही. माझ्या जीविताला धोका आहे, असे सांगत त्यांनी उपायुक्त कापडणीस यांच्याकडे गॅस गोडाउनच्या चाव्या सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला. कापडणीस यांनी त्यांची समजूत घालत पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांना भ्रमणध्वनीवर ऑक्‍सिजन सिलिंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीला पोलिस संरक्षण प्रदान करावे, अशी सूचना केली. यानंतर  मेहता यांनी पुरवठा करण्यास सहमती दर्शविली. 

सेवा शहरासाठी अत्यंत आवश्‍यक

शहराला कोरोनापासून वाचविण्यासाठी कोविड रुग्णालयांना ऑक्‍सिजन गॅस सिलिंडरची नितांत आवश्‍यकता आहे. मेहता राष्ट्रीय कर्तव्य करत असून, त्यांची सेवा शहरासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. महापालिकेला यापूर्वीच श्री. मेहता यांच्या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनास मदत करणाऱ्या लोकांना व संस्थांना सहकार्य करावे. - नितीन कापडणीस, उपायुक्त, मालेगाव महापालिका  

असमर्थता दर्शविल्याने खळबळ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने तयार केलेल्या कोविड हॉस्पिटलला ऑक्‍सिजन सिलिंडर पुरविणाऱ्या इंदूर गॅस एजन्सी यांना काही नागरिक कायमच जबरदस्ती व अरेरावी करतात. त्यामुळे यापुढे सिलिंडर पुरविण्यास असमर्थता दर्शविल्याने खळबळ उडाली. एजन्सीला पोलिस बंदोबस्त व संरक्षण देण्याचे आश्‍वासन उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिल्यानंतर संचालकांनी सहमती दर्शविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com