वन विभागाकडून रोपे मिळेनात..शाळांना बसतोय खासगी नर्सरीतून आर्थिक भुर्दंड 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 10 July 2020

यंदा जुलै महिना उजाडला तरी रोपांचा पुरवठा होत नसल्याने शाळा प्रशासनाला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खासगी रोपवाटिकेतून महागडी रोपे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे तत्काळ रोपे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली आहे. 

नाशिक / कंधाणे : राज्य शासनाने सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना वृक्षारोपण मोहिमेंतर्गत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यानुसार शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे; परंतु वन विभागाकडून अद्यापही रोपांचा पुरवठा होत नसल्याने खासगी रोपवाटिकेतून महागडी रोपे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे वन विभाग व ग्रामपंचायतीकडून रोपे पुरवावीत, अशी मागणी शाळा प्रशासनाकडून केली जात आहे. 

शाळांना खासगी नर्सरीतून आर्थिक भुर्दंड 
पर्यावरण दिनापासून वनमहोत्सव साजरा केला जातो. त्या काळात शाळांकडून आवारात, गावातील पडीक जमीन किंवा विद्यार्थ्यांच्या घराजवळ, शेतातील बांधावर वृक्षारोपण केले जाते. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा जुलै महिना उजाडला तरी रोपांचा पुरवठा होत नसल्याने शाळा प्रशासनाला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खासगी रोपवाटिकेतून महागडी रोपे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे तत्काळ रोपे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली आहे. 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

शिल्लक रोपे शाळांना दिली जातील.
दीड कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत इतर यंत्रणेला रोपपुरवठा केला जात होता; परंतु चालू वर्षी फक्त वनीकरण विभागासाठी रोपनिर्मिती करण्यात आली आहे. वनजमिनीवर वृक्षारोपण केल्यानंतर शिल्लक रोपे शाळांना दिली जातील. -आर. एस. साठे, वनाधिकारी, सटाणा विभाग 

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

दर वर्षी मार्च-एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांच्या परिसर सहली काढून गावाजवळील माळरान व डोंगर-टेकड्यांवर बीजारोपण केले जाते; परंतु चालू वर्षी कोरोना व्हायरसमुळे सहलींचे आयोजन व बीजारोपणसुद्धा करण्यात आले नसून ग्रामपंचायतीकडून रोपे उपलब्ध व्हावीत. -एम. एस. भामरे केंद्रप्रमुख, कंधाणे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial crunch from private nurseries to schools nashik marathi news