गादी कारखान्यात आगीचे रौद्ररूप ...चिंधी कापूस भस्मसात!

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 23 जानेवारी 2020

ज्वलनशील कापड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. पिंपळगाव अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंबातील पाणी संपल्याने गाडी दोनदा भरूनही आगीचे लोळ कायम होते. नंतर ओझर एचएएलच्या फायरप्रूफ अग्निशमन दलाच्या बंबाने अवघ्या काही क्षणांतच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पिंपळगाव बसवंत,शमीन हाजी अहमद पिंजारी यांचा गादी कारखाना खाक झाला. शहरातील बाबा मंगल कार्यालय परिसरात लागलेल्या भीषण आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गाळ्यांमधील असलेल्या गाद्यांचा चिंधी कापूस पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना बुधवारी (ता. 22) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पिंपळगाव अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. ओझर एचएएलच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळविले. दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्‍यात आली. 

पाच लाख रुपयांचे नुकसान.. 

बाबा मंगल कार्यालयालगत असलेल्या पत्र्यांच्या गाळ्यांना शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. आगीत गाद्यांच्या चिंधी कापसासह गाळ्यांचे पत्रे पूर्णपणे खाक होत गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. ज्वलनशील कापड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. पिंपळगाव अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंबातील पाणी संपल्याने गाडी दोनदा भरूनही आगीचे लोळ कायम होते. नंतर ओझर एचएएलच्या फायरप्रूफ अग्निशमन दलाच्या बंबाने अवघ्या काही क्षणांतच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी मोठे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

ग्रामपालिकेला नवीन बंब देण्यात हरकत नाही
पिंपळगाव बसवंतची लोकसंख्या पाहता अग्निशमन बंबाची क्षमता कमी आहे. ओझर व नाशिकहून बंब येण्यासाठी 30 मिनिटे लागतात. तोपर्यंत नुकसान जास्त होते. ग्रामपालिका निधीसाठी कमी पडते. बाजार समितीने ग्रामपालिकेला नवीन बंब देण्यात हरकत नाही. - महेंद्र गांगुर्डे, माजी सरपंच, पिंपळगाव बसवंत 

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire at factory pimplegaon basvant Nashik Marathi News