आधी केला गोळीबार...नंतर सिनेस्टाईलने पाठलाग करीत कोयत्याने केले वार...थरारक!

किरण भडांगे.jpg
किरण भडांगे.jpg
Updated on

नाशिक : (म्हसरूळ) मखमलाबाद रोडवरील शांतीनगर येथे राहणाऱ्या किरण भडांगे याच्यावर उदयनगर येथील लॉन्ड्रीमध्ये कपडे इस्त्री करण्यासाठी गेला होता. त्यावेळी  सकाळी पाऊणे अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान गोळीबार केल्याची घटना घडली. यात संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अशी घडली घटना

मखमलाबाद येथील शांतीनगरमध्ये राहणाऱ्या किरण भडांगे आपल्या आई - वडील भावासोबत राहतो. सोमवार (ता.९) रोजी सकाळी पाऊणे अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास किरण हा कपडे ईस्त्री करण्यासाठी उदयनगर येथील ओम साई लाँड्री येथे आला होता. संशयित प्रशांत, कुणाल, चेतन व सचिन यांनी त्यावर गोळीबार केला. यात जवळपास तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी किरण यास डाव्या हाताला लागली, या ठिकाणाहून किरण याने पळ काढला. परंतु संशयित यावर न थांबता सिनेस्टाईल पाठलाग करीत कोयत्याने वार केले. किरण कसबसा त्यांचे घराजवळ पोहचला. त्यावेळी त्यांच्या भाऊने घरामध्ये घेत घरचा दरवाजा लावून घेतला आणि संशयित त्या ठिकाणाहून पसार झाले. यात जखमी झालेल्या किरण भडांगे सुरुवातीस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु पुढील उपचारार्थ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोहचले. तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त अनिरुद्ध आढाव यांनी घटनस्थळाची पाहणी केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

सिने स्टाईल थरार 

मखमलाबाद रोडवर नेहमी गाड्यांची ये जा सुरू असते आणि शांती नगर हा परिसर नेहमी नागरिकांची गर्दी असते. सराईत किरण यावर रोड लगत असलेल्या ओम साई लाँड्री येथे गोळीबार झाला परंतू संशयितांचा डाव हा किरणला मारणे हाच होता. किरण जीव वाचवून पळत असतांना संशयित त्याच्या पाठीमागे मुळशी पॅटर्न सिने स्टाईल पाठलाग करीत कोयत्याने वार करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. परंतू यात किरण सुदैवाने वाचला.

घटना स्थळी बघ्यांची गर्दी

घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोलिस पोहचले तसेच परिसरात ही घटनेची बातमी पसरताच. परिसरातील नागरिक व मखमलाबाद रोडवर येणारे जाणारे नागरि कांनी एकच गर्दी केली होती. संशयित प्रशांत फड व कुणाल ऐखंडे पंचवटी परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार हिरावाडीनंतर आडगाव शिवार, तपोवन क्रॉसिंग अक्षरशः सिनेस्टाईल पाठलाग केला आणि संशयित प्रशांत व कुणाल यास ताब्यात घेतले. त्यावेळी या संशयितांकडून दोन रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com