esakal | नाशिक जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ डॉ. विनय ठकार यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

vinay thakar.jpg

शहरातील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. विनय वसंत ठकार (वय 74) यांचे आज गुरुवारी (ता. 29) पहाटे निधन झाले. डॉ. विनय ठकार हे जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ, निसर्ग प्रेमी छायाचित्रकार आणि अनेक संस्थांचे आधारस्तंभ होते.

नाशिक जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ डॉ. विनय ठकार यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : शहरातील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. विनय वसंत ठकार (वय 74) यांचे आज गुरुवारी (ता. 29) पहाटे निधन झाले. डॉ. विनय ठकार हे जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ, निसर्ग प्रेमी छायाचित्रकार आणि अनेक संस्थांचे आधारस्तंभ होते.

ते उत्तम छायाचित्रकार देखील होते...

डॉ. विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. निष्णात हृदयरोग तज्ञाबरोबरच ते उत्तम छायाचित्रकार होते. त्यांच्या संग्रहात लक्षावधी फोटो होते. मुलांमध्ये निसर्गप्रेम वाढावे म्हणून शेकडो स्लाईड शो केले. त्यासाठी संपूर्ण अनेक देशांत प्रवास केला होता. नाशिक मधील पक्षीमित्र आणि वन्यजीव प्रेमी म्हणूनही ते सुपरिचित होते. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त मंडळ सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे आज नाशिक मधील संस्थेच्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

go to top