मराठीतून बुद्धिबळ शिकण्याची प्रथमच संधी! या 'ॲप'मध्ये कोडी, प्रश्‍नमंजूषाचा समावेश 

chess.jpg
chess.jpg
Updated on

नाशिक : आजचे तंत्रज्ञानाचे युग आणि देशवासीयांनी स्वदेशी खेळाकडे अधिक लक्ष देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन या दोन्हींची सांगड घालत येथील तरुण बुद्धिबळपटू विनायक वाडिले याने बुद्धिबळाविषयी ‘चेसविकी’ नावाचे ॲप तयार केले आहे. अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या ॲपला नाममात्र ३ एमबी जागा लागते. त्यामुळे ॲपला बुद्धिबळप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

मराठीतून बुद्धिबळ शिकण्याची चेसविकी ॲपद्वारे प्रथमच संधी 
या ॲपमध्ये बुद्धिबळातील हजारो कोडी आहेत. त्यात बुद्धिबळाविषयी प्रश्‍नमंजूषाचाही समावेश असून, त्यात जिंकल्यास आकर्षक बक्षीसेदेखील मिळणार आहे. याशिवाय या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे, यावर बुद्धिबळविषयक प्रश्‍नही विचारले जाऊ शकतात. तसेच या ॲपमध्ये वेबिनार या संकल्पनेद्वारे बुद्धिबळातील विविध ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर मराठीतून बुद्धिबळाचे धडे देणार आहेत. त्यामुळे मराठीतून बुद्धिबळाचे धडे देणारे हे पहिलेच ॲप ठरले आहे.

विनायक वाडीले याच्या ॲपमध्ये कोडी, प्रश्‍नमंजूषाचा समावेश 

विनायकने यापूर्वी आशिया खंडातील बुद्धिबळविषयक पहिले संकेतस्थळदेखील तयार केले होते. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विनायकच्या कार्याचा गौरव म्हणून त्याला गेल्या वर्षी नाशिक मिरची युथ आयकॉन, राष्ट्रीय यंग बिर्ला इंडियन ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. नुकतेच राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कारानेही त्याला सन्मानित करण्यात आले आहे. सध्याच्या मंदीसदृश वातावरणात अनेक उद्योग बंद पडत असताना विनायकचे हे नवे ॲप नाशिकचे तरुण जगात कुठेच कमी पडत नसल्याचे स्पष्ट करण्यास पुरेसे आहे.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com