नांदुरमधमेश्वर अभयारण्यात "नव्या' सहा पाहुण्यांचे आगमन...पक्षीप्रेमींत आनंदच आनंद

चित्रबलाक.jpg
चित्रबलाक.jpg

नाशिक : नुकतेच नांदूर मधमेश्वरचा समावेश हा रामसारच्या यादीत करण्यात आलेला आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरण पाण्याने भरलेले आहे. त्यामुळे चित्रबलाक (Painted Stork) या जातीच्या पक्षांना यंदा घरटे बनवण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. चित्रबलाक या पक्षाच्या ३ जोडप्यांनी प्रत्येकी २ अशा ६ पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे वनविभाग तसेच पक्षी प्रेमींकडुन आनंद व्यक्त होत आहे.

वनविभाग तसेच पक्षी प्रेमींकडुन आनंद

महाराष्ट्रात या पक्ष्याचा प्रजनन कालावधी नोहेंबर ते मार्च असा असतो. मागील दोन वर्षांपासून या पक्ष्यांनी फेब्रुवारी मार्च महिन्यात घरटे बनविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि घरटे बनविल्यानंतर पाणी कमी झाल्याने त्यांनी अंडी घातली नव्हती. यावेळी मात्र या पक्ष्यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात विलायती बाभळीच्या झाडांवर काड्या वापरून घरटे बनवायला सुरुवात केली होती. त्यानंतरच्या काळात पाणी कमी न झाल्याने ३ जोडप्यांनी प्रत्येकी २ अशा ६ पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे वन विभाग तसेच पक्षी प्रेमींकडुन आनंद व्यक्त केला जात आहे. हे पक्षी साधारणपणे ३ ते ४ अंडी घालतात व अंडी उबवणीचा कालावधी ३० दिवसांचा असतो. जन्मलेल्या पिलांना पंख नसतात व डोळे उघडलेले नसतात. त्यामुळे नर व मादीला पुढे २ महिने पिलांची काळजी घ्यावी लागते. या काळात वेगवेगळ्या भक्षकांचा धोका असल्याने नर व मादी पाळीने या पिलांना खाद्य आणतात व त्यांची राखण करतात. 

तथापि आता धरणातील पाणी कमी होत असून वरील धरणांतून पाणी येईपर्यंत या पक्षांवर काय परिणाम होतो याबाबत वनविभाग लक्ष ठेवून आहे. काळजी म्हणून या घरट्याजवळचा भाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. चित्रबलाक हा रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com