चिंताजनक! नाशिक जिल्हा @559.. अन्य शहरातही आकडा वाढतोय...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

जिल्ह्यात शुक्रवारी (ता ८) ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे आकडा ५५९ पोहचला आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे. प्रामुख्याने नाशिक शहरात १३, विंचूर २, दिंडोरीत १ तर मालेगावात २१ असे जिल्ह्यात ३८ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

नाशिक : सावधान, नाशिक शहरातही कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता8) सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मालेगावात 21, नाशिक शहरात 13 तर विंचूरमध्ये 2, दिंडोरीत एक तर परजिल्हयातील एक असे नवीन 38 कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. 

जिल्ह्यात आज नवीन 38 कोरोनाचे रुग्ण

जिल्ह्यात आज नवीन 38 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रेसतांचा आकडा 559 झाला आहे. आज आढळून आलेल्यामध्ये 21 रुग्ण मालेगावातील आहेत. तर नाशिक शहरातही 13 रुग्ण वाढले आहेत. यात सातपूरमध्ये 8, सिडकोत 2, पंचवटीतील हिरावाडीत 1, श्रीकृष्ण नगरमध्ये 1 आणि पाथर्डी फाटा तेथे 1 रुग्ण आहे तर सोलापूरचा एक आहे. उर्वरित जिल्यात विंचूरमध्ये 2 आणि दिंडोरी तालुक्यातील इंदोरेतील 1 रुग्ण, असे 38 रुग्णाची भर पडली आहे. नाशिक शहरात कोरोनाचा धोका वाढला असुन आता तर या विषाणूने दिंडोरी तालुक्यातही शिरकाव केला आहे. यापूर्वी कोरोनाचे निफाड, सिन्नर, नांदगाव (मनमाड), चांदवड, सटाणा, दाभाडी (मालेगाव ग्रामीण) मध्ये शिरकाव केलेला आहे.

तर दुसरीकडे दिलासा..

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. पण दुसरीकडे दिलासादायक बाबही घडली आहे. ४२० प्रलंबित अहवालापैकी तब्बल ३८० अहवाल निगेटिव्ह आले असल्याने तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी (ता ८) ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे आकडा ५५९ चा आकडा गाठला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे. कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे.

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five fifty nine corona positive found in nashik district nashik marathi news