..तर पाच लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारकांचे धान्य होणार बंद!

Five lakh 42 thousand ration card holders will be deprived of foodgrains nashik marathi news
Five lakh 42 thousand ration card holders will be deprived of foodgrains nashik marathi news
Updated on

नाशिक  : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे अनेकांच्या पोटापाण्या प्रश्न निर्माण झाला. अशा लोकांच्या मदतीसाठी सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर केले. त्याअंतर्गत जिल्हयातील 38 लाख शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ झाला. मात्र आता शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक नसल्यास धान्य बंद केले होणार आहे.

नाशिक जिल्हयात सुमारे 5 लाख 42 हजार 42 लाभार्थ्यांनी अद्याप शिधापत्रिका आधार लिंक केली नसल्याचे समोर आले आहे 
कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन झाला. त्यामुळे गरिब कुटुंबाचा अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. अशा काळात सरकारने मोफत रेशन वाटप करून दिलासा दिला आहे. मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप रेशनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. त्यांना पुढील काळात मोफत धान्य सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यांचे रेशनकार्ड रदद केले जाणार नाही. परंतु जर आधार जोडले गेले तर भविष्यात त्यांना सहज धान्य मिळेल.

1 फेब्रुवारीपासून रेशन​ बंद

जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 8 लाख 81 हजार 422 लाभार्थी आहेत. यातील 1 लाख 34 हजार 535 शिधापत्रिकाधारकांनी आधार लिंक केलेली नाही. तर इतर योजनांचे 29 लाख लाभार्थी आहेत. एकूण 5 लाख 42 हजार 42 लाभार्थ्यांनी अद्याप आधार लिंक न केल्याने त्यांना 1 फेब्रुवारीपासून रेशन दिले जाणार नाही.

लाभार्थ्यांनी जानेवारीचे धान्य घेण्यासाठी येतांना कुटंबातील सदस्यांचे आधार कार्डचे झेरॉक्सप्रत घेउन यावी जेणेकरून आधार लिंक करणे शक्य होणार आहे. याकरीता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 
-अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com