esakal | धक्कदायक! साखरपुडा आटोपून येणाऱ्या वरासह कुटुंबातील पाच जणांवर काळाचा घाला...
sakal

बोलून बातमी शोधा

hussain.jpg

साखरपुडा आटोपून परत येत असताना वरासह अकोल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कुटुंबातील पाच जण ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. मृत पावलेल्यापैकी दुर्दैवी बालकांवर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. होतकरू मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने समाज बांधव आणि द्वारका परिसरात शोककळा पसरली आहे.

धक्कदायक! साखरपुडा आटोपून येणाऱ्या वरासह कुटुंबातील पाच जणांवर काळाचा घाला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इंदिरानगर : नागपूर येथून साखरपुडा आटोपून परत येत असताना वरासह  काल (ता.20) ला अकोल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कुटुंबातील पाच जण ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोले येथे उपचार सुरू आहेत.मृतात दोन चिमुरड्यांचा देखील समावेश आहे. सर्व जण नाशिक मधील दाऊदी बोहरा समाज बांधव आहेत.

कुटुंबातील ५ जणांवर काळाचा घाला..२ बालकांचाही समावेश

याबाबत स्थानिक समाजबांधवांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार 17 ला गुलामहुसेन रामपूरावाला (47) त्यांचा मुलगा हुसैन रामपूरा वाला (26) याच्या साखरपुड्यासाठी नागपूर येथे पत्नी फातेमा (47) आणि हुसैनचा जिवलग मित्र बुऱ्हानुद्दीन दिलावर (25) सह होंडा कार क्रमांक एम एच 04 बी डब्लू  5259 द्वारे रवाना झाले. बुऱ्हानुद्दीन कार चालवत होता. शुक्रवार (ता.19) ला साखरपुडा झाला. हुसैनचे मामाचे गाव असल्याने दोन दिवस तिथेच ते राहिले. सोमवारी (ता.20) ला सकाळी नागपूर येथून ते नाशिकला येण्यासाठी रवाना झाले. येताना मुंब्रा येथील रहिवासी आणि त्याची चुलत बहीण झैनब हबीब (30) ह्या देखील त्यांच्या तसनीम (4) आणि बुऱ्हानुद्दीन (चार महिने) या मुलांसह नाशिकपर्यंत येण्यासाठी निघाल्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास मुर्तीजापुर जवळ ट्रकसोबत झालेल्या समोरासमोर धडकेमध्ये हुसैन,फातेमा,बुऱ्हानुद्दीन यांच्यासह दोन्ही बालके ठार झाली.तर गुलाम हुसैन आणि सौ हबीब गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अकोले येथे उपचार सुरू आहेत.

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

परिसरात शोककळा

दरम्यान हुसेन, फातेमा आणि या दुर्दैवी बालकांवर नागपूर येथे तर बुरहानुद्दीन दिलावर याच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. होतकरू मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने समाज बांधव आणि द्वारका परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!