कोरोना विरोधातील लढाई जिंकणारच! छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 15 August 2020

यंदा कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले मुख्य शासकीय सोहळा नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला.यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नाशिक : यंदा कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले मुख्य शासकीय सोहळा नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला.यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहरासह जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरोना विरोधातील लढाई जिंकण्याचा विश्वास

भुजबळ यांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह अन्य मान्यवर तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते

शरद पवार यांच्या कुटुंबात कोणताही वाद नाही

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सीबीआय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संदर्भातील केलेल्या टिपणी बद्दल बोलण्यास त्यांनी नकार दिला तसेच शरद पवार यांच्या कुटुंबात कोणताही वाद नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन

यावेळी त्यांच्या हस्ते शासनाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या फिजिशियन क्लाऊड फिजिशियन या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flag hoisting from Chhagan Bhujbal in Nashik marathi news