कोरोनामुळे यंदा नवरात्रोत्सव बंद! झेंडू फूलांची मागणी घटल्याने व्यावसायिक चिंतेत

विजय पगारे 
Thursday, 15 October 2020

तालुक्यासह जिल्हाभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फुलशेतीला मोठा फटका बसला असून येणाऱ्या आगामी नवरात्र, दसरा तसेच दिवाळी सणांना झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते.

नाशिक/इगतपुरी  : तालुक्यासह जिल्हाभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फुलशेतीला मोठा फटका बसला असून येणाऱ्या आगामी नवरात्र, दसरा तसेच दिवाळी सणांना झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवर शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवादरम्यान होत असलेले यात्रोत्सव बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे अनेक छोटे मोठे व्यापारी तसेच उत्पादक, फुल विक्रते व फुलांची लागवड करणारे शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, बेलगाव कुऱ्हे आदीं गावातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे  

यात्रोत्सव बंदचे आदेश

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील झेंडूच्या फुलांची महागडी बियाणांची लागवड केली असून महागडी जंतूनाशक औषधांची फवारणी केली आहे.यामुळे हाताच्या फोडाप्रमाणे फुलांची काळजी घेत पिक जोमाने बहरत असतांनाच जिल्हा प्रशासनाने इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत असणाऱ्या घाटनदेवीच्या नवरात्रोत्सवासह भगुर, येवला, चांदवड येथील रेणुकादेवी ,सप्तश्रृंगी गडावरील उत्सवासह इतर ठिकाणचे यात्रोत्सव बंद केल्यामुळे झेंडूच्या फुलांची मागणी घटली असून भावही वधारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून सर्व खर्च वाया जाणार या भावनेने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

फुलांची मागणी घटली

यावर्षी चांगला भाव मिळेल या भावनेने अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीच्या झेंडूच्या फुलांचे नियोजन करत लागवड केली. महागडी खते, औषधे फवारणी करत फुले टवटवीत केली असतांनाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे कमीतकमी नवरात्र उत्सवादरम्यान तरी उघडतील अशी मनामध्ये धारणा असतांना शासनाने सर्वच ठिकाणचे याञौत्सव बंद करण्याचे फर्मान काढल्यामुळे कष्टाने पिकवलेल्या फुलांची मागणी घटली असून सर्व खर्च पाण्यात गेल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे तसेच बंद असलेले धार्मिक याञौत्सव नवरात्रीत सुरु होतील अशी मनामध्ये धारणा होती.परंतू नुकताच शासनाने दिलेल्या आदेशानुसार याञौत्सव बंद झाल्यामुळे कष्टाने तयार केलेल्या फुलांची मागणी घटली असून सर्व खर्च वाया जाणार आहे.शासनाने नवराञौत्सवासाठी मंदिरे खुली करण्याची गरज होती यामुळे अनेक छोट्या मोठ्या विक्रेत्यांना दिलासा मिळाला असता.
- राजू काजळे, फूलशेती, शेतकरी व विक्रेता नांदूरवैद्य ता इगतपुरी 

 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flower sales declined producers worried in nashik marathi news