उन्हाळ कांद्याच्या भावात चढ-उतार; पिंपळगाव बसवंतमध्ये क्विंटलचा कमाल भाव पाच हजार

महेंद्र महाजन
Friday, 25 September 2020

उन्हाळ कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू असले, तरीही ते फारसे मोठे नाहीत. गुरुवारी (ता. २४) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा क्विंटलचा भाव तीन हजार ते तीन हजार ९०० रुपयांपर्यंत राहिला, तसेच पिंपळगाव बसवंतमध्ये क्विंटलचा कमाल भाव पाच हजार रुपये निघाला

नाशिक : उन्हाळ कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू असले, तरीही ते फारसे मोठे नाहीत. गुरुवारी (ता. २४) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा क्विंटलचा भाव तीन हजार ते तीन हजार ९०० रुपयांपर्यंत राहिला, तसेच पिंपळगाव बसवंतमध्ये क्विंटलचा कमाल भाव पाच हजार रुपये निघाला. 

पिंपळगावला क्विंटलचा कमाल भाव पाच हजार 
जिल्ह्यात बुधवारी (ता. २३) तीन हजार २०० ते तीन हजार ७०१ रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली. आजचा क्विंटलचा कमाल भाव रुपयांमध्ये असा (कंसात क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये) ः येवला- तीन हजार ९७५ (तीन हजार २००), नाशिक- तीन हजार ६०० (तीन हजार), लासलगाव- चार हजार १५१ (तीन हजार ३००), कळवण- चार हजार ११५ (तीन हजार ३५०), चांदवड- चार हजार १४१ (तीन हजार ३५०), मनमाड- तीन हजार ५३७ (तीन हजार २५०), सटाणा- चार हजार ३१० (तीन हजार ३५०), दिंडोरी- तीन हजार ८३९ (तीन हजार ३७७), उमराणे- चार हजार ३५० (तीन हजार ७७५), पिंपळगाव बसवंत- पाच हजार (तीन हजार ९००).  

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fluctuations in summer onion prices nashik marathi news