esakal | आदिवासी शेतमजुरांकडून जबरदस्तीने काम; दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

grapes farming tribal.jpg

ठरल्याप्रमाणे बागातील काम करत असताना, द्राक्षबागमालक शेतकरी यांनी जे काम ठरवलेले ते न सांगत इतर काम करायला लावले. दरम्यानच्या काळात मजुरांना ४० दिवस १२-१२ तास काम केले असताना द्राक्षबागमालकाने आदिवासी शेतमजुरास शिवीगाळ करून मारहाण व मारण्याची धमकी दिली.

आदिवासी शेतमजुरांकडून जबरदस्तीने काम; दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : द्राक्ष बागेमध्ये जबरदस्तीने कामाला लावून काम करून घेत मोबदल्यात कमी मजुरी देणे, तसेच आदिवासी शेतमजुरांच्या मोटारसायकली अडकवून ठेवल्याप्रकरणी शिंदवड (ता. दिंडोरी) येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर वेठबिगार कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आदिवासी शेतमजुरांकडून जबरदस्तीने काम 
सुरगाणा तालुक्यातील थविलपाडा येथील भगवंत भोये (वय ३९, रा. थविलपाडा, ता. सुरगाणा) यांनी जुलै महिन्यात शिंदवड येथील द्राक्ष उत्पादक भाऊसाहेब गाडे यांच्याकडून द्राक्षबागेचे काम ठरवित मजुरांसाठी ८० हजार रुपये उचल घेतील. ठरवलेले काम करण्यासाठी ११ सप्टेंबर २०२० ला शेतमजूर द्राक्षबाग कामासाठी शिंदवड येथे आले. दरम्यान, ठरल्याप्रमाणे बागातील काम करत असताना, द्राक्षबागमालक शेतकरी यांनी जे काम ठरवलेले ते न सांगत इतर काम करायला लावले. दरम्यानच्या काळात मजुरांना ४० दिवस १२-१२ तास काम केले असताना १८ ऑक्टोबर २०२० ला द्राक्षबागमालक भाऊसाहेब गाडे यांनी भगवंत भोये या आदिवासी शेतमजुरास शिवीगाळ करून मारहाण व मारण्याची धमकी दिली. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा 
या वेळी शेतमजुरांनी कामाच्या ठिकाणाहून जाण्याचा प्रयत्न केल्याने श्री. भोये यांच्यासह दीपक शेळके, हिरामण गाढवे, देवीदास तलवारे यांच्या चार मोटारसायकली जप्त केल्या. त्यानंतर भोये यांनी वणी पोलिस ठाणे गाठत द्राक्ष उत्पादक भाऊसाहेब गाडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गाडे यांच्याविरुद्ध वेठबिगार आणि अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

संपादन - ज्योती देवरे

go to top