esakal | हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल; T55 रशियन बनावटीच्या रणगाड्याने लौकिकात भर
sakal

बोलून बातमी शोधा

t55.jpg

टी 55 या रणगाड्यांनी सन १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या ५८ रणगाडे नष्ट केले होते. सन १९६० ते १९८० या काळात सीमाहद्दीवर या रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्यादलात चांगलीच दहशत निर्माण केली होती.

हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल; T55 रशियन बनावटीच्या रणगाड्याने लौकिकात भर

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : पाकिस्तानला युद्धात धूळ चारणारा आणि भारतीय लष्कराच्या ताफ्यातील T55 हा रणगाडा बुधवारी (ता.२१) रात्री नाशिकमध्ये दाखल झाला. नगरसेवक प्रविण तिदमे यांच्या दीड वर्षांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

T55 रशियन बनावटीच्या रणगाड्याला मंजुरी ​

नाशिकमधील नागरिकांना भारतीय सैन्यदलाच्या पराक्रमाची, शौर्याची महती कळावी आणि तरुणांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी नाशिक मध्ये सैन्यदलाची वॉर ट्रॉफी असावी अशी संकल्पना नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी मांडली. तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने लष्कराने T55 हा रशियन बनावटीचा रणगाडा नाशिक महापालिकेला देण्यास मंजुरी दिली. गेल्या दीड वर्षांपासून हा रणगाडा नाशिकमध्ये आणण्यासाठी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे व नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्नशील होते.

नाशिक मनपा व नगरसेवक प्रविण तिदमे यांचे प्रयत्न सफल​

अलीकडेच त्यांनी महासभेतच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या. बुधवारी पुणे येथून हा 40 टन वजन असलेला रणगाडा नाशिक महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. जुने सिडकोतील लेखानगर येथे हा रणगाडा ठेवण्यात येणार आहे. मात्र, येथील काम पूर्ण झालेले नसल्याने हा रणगाडा सध्या जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या मागील क्रीडांगणात उतरविण्यात आला आहे. टी 55 या रणगाड्यांनी सन १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या ५८ रणगाडे नष्ट केले होते. सन १९६० ते १९८० या काळात सीमाहद्दीवर या रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्यादलात चांगलीच दहशत निर्माण केली होती. भारतीय सैन्यदलात या रणगाड्यांनी ४० वर्षे देशसेवा केली आहे आणि आता नाशिकच्या लौकिकात भर घालणार आहे.

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश