
वनविकास नाशिक विभागाच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैधरित्या वाहतूक होणार असल्याचे कळताच धडक कारवाई करण्यात आली.
सिडको (नाशिक) : वनविकास नाशिक विभागाच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैधरित्या वाहतूक होणार असल्याचे कळताच गस्ती पथकातील वनपरिमंडल अधिकारी राहुल वाघ, दीपक बोरसे, वनरक्षक सुनील बोरसे व वाहनचालक पंकज पाटील यांनी सापळा रचून मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी ते नाशिक पाठलाग करून नाशिकजवळ गरवारे पॉईंटवर पहाटे ४:३० वा. आयशर गाडी व ३ संशयित रंगेहाथ पकडण्यात आले.
गाडी व ३ संशयित रंगेहाथ पकडण्यात यश
मिळालेल्या गुप्त माहिती नुसार विभागीय व्यवस्थापक यु. सी.ढगे व वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एस.डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक कार्यकेंद्रातील घोटी परिसरात लगत असलेल्या मालकी क्षेत्रातील वृक्षतोड करून अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या टाटा कंपनीच्या आयशर मिनी ट्रक(MH15 AG4600) पकडण्यात यश आले.
हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट
हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर