चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर

माणिक देसाई
Friday, 18 December 2020

 प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तसेच जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न केले, तर निश्चयी लोकं विजय घडवून आणतात. हजारो अडथळे पार करतात, धडपडतात, हरतात अगदी रडतात सुद्धा पण पुन्हा उठतात, पुन्हा प्रयत्न करतात. यश प्रत्येक पावलानिशी जवळ येतं, पण अखंड चालण्याची तयारी ठेवली आणि स्वप्न मोठी असतील तर प्रयत्नांना बरोबर लागते ती जिद्द आणि चिकाटी. आणि अशाच एका चिमुरडीचे कर्तृत्व सर्वांचं मन जिंकत आहे.

निफाड (जि.नाशिक) : प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तसेच जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न केले, तर निश्चयी लोकं विजय घडवून आणतात. हजारो अडथळे पार करतात, धडपडतात, हरतात अगदी रडतात सुद्धा पण पुन्हा उठतात, पुन्हा प्रयत्न करतात. यश प्रत्येक पावलानिशी जवळ येतं, पण अखंड चालण्याची तयारी ठेवली आणि स्वप्न मोठी असतील तर प्रयत्नांना बरोबर लागते ती जिद्द आणि चिकाटी. आणि अशाच एका चिमुरडीचे कर्तृत्व सर्वांचं मन जिंकत आहे.

कळसुबाई... नॉनस्टॉप तीन तासात पार

शिवडी (ता निफाड ) येथील सचिन भवर यांना लहानपणापासुन भटकंतीची आवड आसल्याने अनेकदा ते गड-किल्ले यांना भेटी देतात. याच आधारे येणारी पीढी देखील मोठ्या प्रमाणात आपली भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे तसेच आपल्या मुलांना आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे. भवर यांना भटकंतीची आवड आहे. ही आवड आपल्या मुलीला लागावी या उद्देशाने ते आपल्या चिमुरड्या राईला सोबत घेऊन गेले. व तिने कळसुबाईचे नॉनस्टॉप तीन तासात पार पाडले  या कामाबद्दल 'राई'चे सर्व स्तरातुन कौतुक होतांना दिसत आहे.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर 'राई' ची करामत

शिवडी (ता निफाड ) येथील सचिन भवर यांची कन्या राई सचिन भवर  (वय ४) हिने चक्क पायी चालत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आपल्या पालकांसोबत पादाक्रांत केले. जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर राईने हे कळसुबाईचे शिखर पार पाडले.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four year old Rai made Kalsubai mountain climbing completed nashik marathi news