आठवणीतील विनायकदादा पाटील : शरद पवार.. सुशिलकुमार..सर्वांनी मिळून फसवलं? एक भन्नाट किस्सा! तुम्ही वाचलाच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

राजकारण म्हणल्यानंतर अनेक किस्से आलेच. मग इतिहास चाळताना तसेच मागे वळून पाहताना एक असा एखादा किस्सा आपल्या हाती लागतो. आणि मग सगळंच कसं हास्यास्पद होऊन जाते. या किस्स्याचं वर्णन विनायक पाटील यांनी आपल्या 'गेले लिहायचे राहून' या पुस्तकात केलं आहे. नेमकं काय झालं होतं..एकदा वाचाच हा भन्नाट किस्सा...

माजी मंत्री विनायकदादा पाटील (वय ७७) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री पावणेबाराला निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतून उपचार घेऊन आल्यानंतर नाशिक येथे ते डायलिसिसवर होते. राजकारण म्हणल्यानंतर अनेक किस्से आलेच. मग इतिहास चाळताना तसेच मागे वळून पाहताना एक असा एखादा किस्सा आपल्या हाती लागतो. आणि मग सगळंच कसं हास्यास्पद होऊन जाते. या किस्स्याचं वर्णन विनायक पाटील यांनी आपल्या 'गेले लिहायचे राहून' या पुस्तकात केलं आहे. नेमकं काय झालं होतं..एकदा वाचाच हा भन्नाट किस्सा...

१९७८ सालचा किस्साच भन्नाट! आयडीया तर लय कमाल....( 'गेले लिहायचे राहून' या पुस्तकातील किस्सा)

हा किस्सा १९७८ सालचा...तेव्हा शरद पवारांनी पुलोदचा कार्यक्रम केलेला. पुलोद गटामध्ये कॉंग्रेसविरोधी असणाऱ्या चाळीस आमदारांचा गट व त्या गटाला पाठिंबा देणारे समाजवादी, भाजप, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष असे अनेकजण होते. त्याच वेळी एका जाहिर कार्यक्रमात हा फसवाफसवीचा (मजेशाीर) उद्योग करण्यात आला. कुसूम अभ्यंकर या त्यावेळी रत्नागिरीच्या आमदार होत्या. लोकप्रतिनिधी बरोबरच त्या उत्तम वक्त्या आणि लेखिका देखील होत्या. त्यांनी नविन कादंबरी लिहली होती व कादंबरीच प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. शरद पवारांसोबतच व्यासपीठावर होते ते ग.प्र प्रधान, सुशिलकुमार शिंदे, सदानंद वर्दे, गोविंदराव आदिक, विनायक पाटील अशी वक्त्यांची यादी देण्यात आली होती. या यादीनुसार सर्वात पहिला उद्घाटक म्हणून शरद पवार बोलणार होते तर सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग.प्र. प्रधान मास्तर बोलणार होते. आत्ता गंम्मत म्हणजे, हे पुस्तक खुद्द शरद पवारांनी देखील वाचलं नव्हतं. तर पुढे असणाऱ्या वक्त्यांच्या यादीबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा नुकतच सरकार स्थापन झाल्यानं सगळेच आपआपल्या कामात व्यस्त. वेळ तर कोणाला मिळणार. त्यातही हा कार्यक्रम दादरमध्ये. आत्ता इतक्या मोठ्या श्रोत्यांपुढे न वाचलेल्या कादंबरीबद्दल काय बोलणार. एकुणच काय तर आत्ता पुढे कस होईल म्हणून प्रत्येकालाच टेन्शन आलं होतं. आणि या शरद पवारांचा देखील नंबर होता. 

प्रत्येकालाच टेन्शन...पण यावर एक भन्नाट आयडीया शोधली कोणी?

पण या यादीत अस एक नाव होतं की जे पुस्तक न वाचता कार्यक्रमाला येणं शक्य नाही हा विश्वास होता. ते नाव म्हणजे ग.प्र.प्रधान यांचं. 
पण प्रधान हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. अध्यक्षीय भाषण तर सर्वात शेवटी होणार होतं. व्यासपीठावर कुजबूज चालू झालेली. आत्ता कस होणार ? इतक्यात विनायक पाटील म्हणाले, मी करतो काहीतरी..ते तडक उठून आयोजकांकडे गेले आणि त्यांना रागातच म्हणाले, अहो चाललय काय ? आयोजकांना काय चुकलय ते नेमकं कळालं नाही त्यांनी विचारलं ? काय झालं ? यानंतर विनायक पाटील म्हणाले, "अहो वक्त्यांची यादी बघा..प्रधान सर्वात शेवटी बोलणार आहेत. अध्यक्ष असले म्हणून काय झालं ? ते सर्वात सिनियर आहेत. त्यांनी अस सर्वात शेवटी बोलणं चुकिचं दिसतं. अस म्हणत, विनायक पाटलांनी कागद घेतला आणि वक्त्यांचा क्रम बदलला. 

PHOTOS : ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील पंचतत्वात विलीन; सरपंच, वनशेतीचे जनक ते मंत्री असा राजकीय प्रवास

सारं कोडं इथेच सुटलं अन् सगळ्य़ांनीच सुटकेचा निश्वास सोडला.. 
यानंतर मग कार्यक्रमाची सुरवात झाली ती ग.प्र. प्रधान यांच्या भाषणाने. ते कादंबरीवर तासभर बोलले तेही त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे उत्तम... पुढच्या वक्त्यांना कादंबरीत नेमक काय आहे ? इथपासून बोलण्यासाठी खूप काही मिळालं. शरद पवारांपासून सुशिलकुमारांपर्यन्त सर्वांनी त्यांच्या भाषणातील मुद्दे उचलले व दहा पंधरा मिनटांच भाषण ठोकून दिलं. विनायक पाटलांच्या या आयड्याबद्दल देखील धन्यवाद मानण्यात आले. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former minister late vinayak patil political funny incident written in book marathi news