आश्चर्यकारक! यंदा गोदावरीला महापुर नाहीच; तब्बल ४८ वर्षांनंतर परंपरेत खंड

godavari river mahapur.jpg
godavari river mahapur.jpg

नाशिक / पंचवटी : नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरीइतका पाऊस झालेला आहे. मात्र नेहमी अधिक पाऊस होणा-या इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरात कमी तर सतत दुष्काळी असलेल्या भागात अधिक पाऊस झाल्याने पावसाची दोलायमानता उघड झाली आहे. पण यंदा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तब्बल ४८ वर्षांच्या खंडानंतर गोदावरी ख-या अर्थाने खळाळलीच नाही. 

राज्यात अनेक भागात ओला दुष्काळ, पण गोदावरी खळाळलीच नाही ​

त्र्यंबकेश्‍वरजवळील ब्रह्मगिरी डोंगरात गोदावरी उगम पावते. या नदीवर गंगापूर धरणाची निर्मिती करण्यात आली. तपूर्वी उन्हाळ्यात नाशिककरांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, आड यांचाच प्रामुख्याने आधार होता. पुढे नाशिकचा विस्तार झाल्यावर कश्‍पपी व गौतमी गोदावरी धरणांची निर्मिती करण्यात आली. यातील कश्‍यपी धरणाच्या निर्मितीसाठी नाशिकचे पहिले महापौर शांतारामबापू वावरे यांनी पुढाकार घेतला होता. 

नाशिककरांचा प्रथमच मोठा हिरमोड
पावसाळा अन गोदावरीचा पूर असे जणू गेल्या काही वर्षातील शहराचे चित्र होते. गोदावरीला आलेला पहिला पूर पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी उसळते. परंतु यावर्षी पूर सोडाच गोदावरी दुथडीही वाहिली नाही, असे चित्र आहे. त्यामुळे पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी करणा-या नाशिककरांचा प्रथमच मोठा हिरमोड झाला. 

महापूर अन नाशिककर 
गोदावरी नदीवर १९५६च्या सुमारास गंगापूर धरणाची निर्मिती केल्यावर सर्वप्रथम ९ सप्टेंबर १९६९साली गोदावरीला प्रथमच महापूर आला. यापुराचे पाणी सोमवार पेठ, नेहरू चौक, सरकारवाडा, तिवंधा चौक अशा नदीकिना-यालगतच्या परंतु सखल भागात पसरले होते. मध्यरात्रीनंतर वाढलेल्या या महापुराने जीवितहानी नाही परंतु मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. त्यानंतर २००८, २०११ आणि २०१६ साली गोदावरीला महापूर आले. त्यामुळे गोदावरी अन महापूर असे जणू समिकरणच बनून गेले होते. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

दुष्काळी भागात महापूर 
यावर्षी पावसाने त्र्यंबकेश्‍वरवर अवकृपा केल्याने गोदावरी खळाळलीच नाही. याशिवाय कादवा खो-यातही समाधानकारक पाऊस न झाल्याने दिंडोरी तालुक्यातील करंजवण व ओझरखेड धरणही पूर्ण क्षमतेने भरले नाही. मात्र सोलापूरसह पश्‍चिम महाराष्ट, विदर्भ, मराठवाडा अशा सतत अवर्षणग्रस्त भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने त्याभागातील गावागावात मोठी पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

यावर्षी काही ठिकाणी तुफानी पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ अशी स्थिती उदभवल्याने पावसाची दोलायमानता सिद्ध झाली आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्पासह नाशिककरांसाठी किकवी धरणाची निर्मिती गरजेची आहे. - राजेंद्र जाधव, अध्यक्ष, जलचिंतन संस्था 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com