सोशल मीडियावरील ‘ते’ संदेश म्हणजे दिशाभूल; जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा

that forwards on social media is misleading nashik marathi news
that forwards on social media is misleading nashik marathi news
Updated on

नाशिक : सध्या कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. कोरोना संबंधित माहिती देणारे अनेक संदेश सध्या सोशल मिडीयावर दिले जात आहेत. दरम्यान अनेक प्रकारची खोटी माहिती देखील अशा प्रकारे पसरवली जाते. अशाच एक संदेशाबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती दिली आहे.

कोरोना रुग्ण शोधला म्हणजे शासनाकडून त्या पालिका, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेला दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळे सध्या भरमसाट रुग्ण शोधले जात असल्याबाबत संदेश  सोशल मीडियावर फिरत आहे. या संदेशाविषयी विचारले असता नाशिकचे जिल्हाधीकारी मांढरे यांनी याविषयी माहिती देताना सांगीतले की, प्रत्यक्षात कोरोना रुग्ण शोधला की असे कुठलेही पैसे कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत नसतात,  हा संदेश म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 

योजनेविषयी इंटरनेटवर सविस्तर माहिती

ते पुढे म्हणाले की, कोरोनारुग्णापोटी ग्रामपंचायत, पालिका किंवा महापालिकेसह कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला किंवा रुग्ण शोधला म्हणून कुठल्या अधिकाऱ्यांना पैसे मिळत नसतात. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत संबंधित सभासद पात्र ठरत असल्यास तो थेट एखाद्या रग्णालयात जाऊन उपचार घेतो. त्या योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णाच्या उपचाराचे पैसे थेट त्या रुग्णालयाला मिळतात त्याच्याशी कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंध येत नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजना हा काही कोरोनाच्या रुग्ण शोधण्याशी संबंधित विषय नाही. या योजनेविषयी इंटरनेटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळेच त्याचा संबंध नाही. त्यामुळे असे जर काही संदेश असतील तर निव्वळ अफवाच आहे, असे स्पष्ट केले.

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com