तब्बल चोवीस तासांनंतर लागला शोध; किशोर सागरवर गेलेल्या तरुणाची मित्रांसोबतची सहल शेवटचीच!

मोठाभाऊ पगार
Tuesday, 6 October 2020

रामेश्वरजवळील किशोर सागर जलाशयात मित्रांसमवेत पोहण्यासाठी युवक गेला होता, त्यावेळी पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने तत्काळ मदतकार्य सुरू केले.परंतु अद्यापही काहीच पत्ता लागला नव्हता. त्यानंतर...

नाशिक / देवळा : रामेश्वरजवळील किशोर सागर जलाशयात मित्रांसमवेत पोहण्यासाठी युवक गेला होता, त्यावेळी पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने तत्काळ मदतकार्य सुरू केले.परंतु अद्यापही काहीच पत्ता लागला नव्हता. त्यानंतर...

तब्बल चोवीस तासांनंतर लागला शोध

सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथील युवक केशव अहिरे (वय २३) हा रामेश्वरजवळील किशोर सागर जलाशयात मित्रांसमवेत पोहण्यासाठी रविवारी (ता. ४) गेला असता, दुपारी तीनला पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने तत्काळ मदतकार्य सुरू केले. परंतु रात्री उशिरापर्यंत मृतदेह मिळून न आल्याने शोधकार्य थांबविले होते. सोमवारी सकाळी मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. शकील अहंमद ऊर्फ तैराक व त्यांच्या सहा जणांच्या पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधला. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

चोवीस तासांनंतर शोधण्यात यश

रामेश्वर (ता. देवळा)जवळील किशोर सागर धरणाच्या जलाशयात बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सोमवारी (ता. ५) सापडला. मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोवीस तासांनंतर त्यास शोधण्यात देवळा पोलिसांना यश आले.

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: found drowned death body nashik marathi news