नोकरी कायम करण्यासाठी शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी; लिपिकासह संस्थाचालक पुत्रास अटक

प्रमोद सावंत
Wednesday, 4 November 2020

या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तर लिपिक व संस्थाचालकाच्या मुलानेही विनयभंग करत एका रात्रीसाठी शरीरसुख दिल्यास तुला कायम करू, असे सांगितले.

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील आझादनगर भागातील सरदार ऊर्दू प्रायमरी स्कूल इस्लामनगर शाळेत राजानगर भागातील ३१ वर्षीय शिक्षिकेस नोकरीत कायम करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या लिपिक तौसिफ अहमद अल्ताफ व अहमद तजूर हसन (रा. सरदारनगर) यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लिपिकासह संस्थाचालक पुत्रास शरीरसुखाच्या मागणीमुळे अटक 
दोघांना मंगळवारी (ता. ३) अटक केली. शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाबाहेर २९ सप्टेंबर व २९ ऑक्टोबरला हा प्रकार घडला. मात्र नोकरीवरून काढून टाकतील, या भीतीने पीडितेने तक्रार केली नाही. तर लिपिक व संस्थाचालकाच्या मुलानेही विनयभंग करत एका रात्रीसाठी शरीरसुख दिल्यास तुला कायम करू, असे सांगितले. तसेच हात पकडून जवळ ओढून मोबाईल हिसकावून घेत पुन्हा विनयभंग केल्याने पीडितेने सोमवारी (ता. २) दोघांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

प्रकारामुळे शहरात खळबळ

या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळी आझादनगर पोलिसांनी संशयितांना अटक केली. दुपारी त्यांना न्यायालयात उभे केले असता, एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.  

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Founders son with clerk Arrested malegaon nashik marathi news