भरधाव कारला पोलिसांनी थांबवताच ड्रायव्हरला फुटला घाम; झडती घेतली तर धक्काच

विनोद बेदरकर
Friday, 16 October 2020

पेठरोड मार्गे मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे आणि उप अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (ता. १५) रात्री इनामबारी शिवारात सापळा लावण्यात आला होता.

नाशिक : मध्यरात्रीची वेळ...भरधाव येणाऱ्या इको कार (जीजे ०६ एचएल ९६५५) वाहनाला थांबवत पोलिसांनी ड्रायव्हरला बाहेर काढले. पोलिसांना बघताच त्यालाही घामच फुटला. वाहनाची झटती घेताच पोलिसही झाले अवाक्...झडतीत सापडले असे काही की पोलिसांनी तोंडाला हातच लावला...वाचा नेमके काय घडले?

असा आहे प्रकार

दिलीपभाई मोतीसिंग वसावा (३३ रा. टेकरा फलिया जि. भुरूच, गुजरात) असे अटक केलेल्या संशयीतांचे नाव आहे. दिंडोरीचे भरारी पथक क्रमांक तीनचे दुय्यम निरीक्षक एस. एस. बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पेठरोड मार्गे मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे आणि उप अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (ता. १५) रात्री इनामबारी शिवारात सापळा लावण्यात आला होता. केंद्रशासित प्रदेशातील दारुची बेकायदा वाहतूक सुरुच असल्याचे शुक्रवारी (ता. 16) रोजी पुन्हा एकदा उघडकीस आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह चार लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करीत वाहनचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. पेठ रोड वरील इनामबारी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

४ लाख ४ हजार ६४० किमतीचा मद्यसाठा हस्तगत

भरधाव येणाऱ्या इको कार (जीजे ०६ एचएल ९६५५) अडवून पथकाने संशयीत चालकास ताब्यात घेत पथकाने वाहन तपासणी केली असता कारमध्ये ब्लेण्डर प्राईड, रॉयल चॅलेंज, मॅजिक मोमेट, ओडका असा मद्यसाठा मिळून आला. या कारवाईत कारसह सुमारे ४ लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास दुय्यम निरीक्षक बागुल करीत आहेत. ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस.बी.शिंदे, जवान व्ही.आर.सानप, एस.एस.पानसरे, व्ही.अ‍े.चव्हाण, व्ही.बी. पाटील, एस.एस.भांगरे, एम.पी.भोये व वाहनचालक एम.ए.खामकर आदींच्या पथकाने केली.  

हेही वाचा >"कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four lakhs Confiscated from illegal liquor excise duty nashik marathi news