धक्कादायक! 'आमच्या भांडणात का पडलास'...रागाचा 'असा' चढला पारा...अन् मग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

गणेश चौकात चार युवकांनी जुन्या भांडणाच्या वेळी तू आमच्या भांडणात का पडलास...तेव्हाच्या घटनेचा राग मनात धरुन कुरापत काढत एका युवकाच्या घरात घुसून तलवारीने वार करत लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली...सविस्तर प्रकार असा की...

नाशिक : (सिडको) गणेश चौकात चार युवकांनी जुन्या भांडणाच्या वेळी तू आमच्या भांडणात का पडलास...तेव्हाच्या घटनेचा राग मनात धरुन कुरापत काढत एका युवकाच्या घरात घुसून तलवारीने वार करत लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली...सविस्तर प्रकार असा की...

अशी आहे घटना

सिडकोतील गणेश चौकात चार युवकांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकावर तलवारीने वार करून लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत जखमी केले. संतोष ऊर्फ भूषण देवरे (वय 26, रा. महादेव मंदिर, गणेश चौक, सिडको) याने संशयित आकाश वानखेडे (26, पाथर्डी), सोनू सोनार (20, स्वामी विवेकानंद नगर), सचिन राठोड (22, स्वामी विवेकानंदनगर) व तुषार निंबाळकर (23, राजीवनगर) यांचे भांडण सोडविले होते. याचा राग मनात धरून चारही संशयितांनी संतोष देवरे याला घरात जाऊन तलवारीने वार करून त्याला मारहाण केली. जखमी संतोषला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी संतोषचा भाऊ महेश देवरे याने पोलिसांत फिर्याद दिली. घटनेनंतर चारही संशयित फरारी होते. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

अंबड पोलिसांसह गुन्हे शाखेने विभागाने तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पाथर्डी-वडनेर रस्त्यावरील दर्गाजवळ चौघांना गुरुवारी पाथर्डी परिसरात सापळा रचून अटक केली. त्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले. 

हेही वाचा > स्वच्छ भारत अभियानात नाशिकचे तारे जमीनवरच! 'या' कारणांमुळे रेटिंग पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four suspects arrested for Assaulting a youth nashik marathi news