esakal | धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज
sakal

बोलून बातमी शोधा

 woman harrasment 1.jpg

पोलिसाची बदली करण्याचे आमिष दाखवून खर्जुल मळा परिसरात त्याच्या पत्नीवर अत्याचार करणारा संशयित गोरख खर्जुल अद्याप मोकाटच असून, अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. पोलिसांच्या कुटुंबीयांवर अत्याचार करणारेच पोलिसांना सापडत नसतील, तर सामान्यांवरील अन्यायाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) खुर्जल मळ्यात राहणाऱ्या संशयित व्यक्तीची तिथल्या महिलेशी ओळख झाली होती...राजकीय संबंधांद्वारे पोलिस दलातील पतीची बदली करून देण्याचे आमिष, तसेच पतीला व मुलाला मारण्याची धमकी आणि याचाच गैरफायदा घेत त्याने धक्कादायक प्रकार केल्याची बाब उघडकीस आली होती. पोलिसाच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यातही कारवाई होत नसल्याने, यातील संशयीतावर राजकीय वरदहस्त आहे, की कोणी खास आहे? अशी कुजबुज पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांत आहे.

पोलिसांच्या कुटुंबीयांवर अत्याचार करणारेच मोकाट

पोलिसाची बदली करण्याचे आमिष दाखवून खर्जुल मळा परिसरात त्याच्या पत्नीवर अत्याचार करणारा संशयित गोरख खर्जुल अद्याप मोकाटच असून, अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. पोलिसांच्या कुटुंबीयांवर अत्याचार करणारेच पोलिसांना सापडत नसतील, तर सामान्यांवरील अन्यायाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 
सिन्नर फाटा परिसरात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत शनिवारी (ता. 16) गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होण्याच्या घटनेला पाच दिवस उलटून गेले आहेत. मुळात काही दिवसांपासून नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या कामकाजाबाबत तसेच बंदोबस्ताच्या निमित्ताने पोलिसांकडून होणाऱ्या कारवायांवरून नाशिक रोड पोलिस चर्चेत आहेत. 

राजकीय वरदहस्त 

संशयित गोरख खर्जुल हा सिन्नर फाटा भागातील शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकेच्या कुटुंबातील आहे. विविध निवडणुकांच्या काळात सिन्नर फाटा व परिसरातील निवडणुकीच्या कामकाजाची सूत्रे तोच हाताळत असल्याने त्याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत ऊठबस आहे. यापूर्वी त्याने दिल्लीतही गोंधळ घातला होता. 
खर्जुलने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर संसदेच्या आवारात हल्ला करण्याचा स्टंट केला होता. गल्ली ते दिल्ली सगळीकडे गोंधळाचे प्रकार केलेल्या संशयिताने पोलिस पत्नीवर अत्याचारच केलेला नाही तर पतीच्या बदलीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली आहे. 

हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?

पोलिस भूमिका संशयात

महिलेला धमकावणे व अश्‍लील फोटो, चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. राजकीय वरदहस्तामुळे संशयित गोरख खर्जुल पोलिसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करायचा का? तसेच नाशिक पोलिसांच्या बदल्यांत राजकीय पदाधिकारी हस्तक्षेप करतात का, असाही प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने पुढे आला आहे. त्यामुळेच फरारी संशयिताच्या बेपत्ता होण्यामागे पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात आहे.

हेही वाचा >  GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 

go to top