अंगणात खेळणाऱ्या ओमवर बिबट्याचा हल्ला..नातेवाइकांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

ओम विष्णू कडभाने अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्या मानेवर हल्ला करीत जखमी केले. उपस्थित मुलाच्या नातेवाइकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने ओमला सोडून पळ काढला.​

नाशिक/ एकलहरे : ओम विष्णू कडभाने अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्या मानेवर हल्ला करीत जखमी केले. उपस्थित मुलाच्या नातेवाइकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने ओमला सोडून पळ काढला. रविवारी (ता. 28) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. 

जिल्हा रुग्णालयात दाखल

ओम हा मामाच्या घरी आला होता. जखमी मुलाला बिटको हॉस्पिटलमध्ये नेले असता, तेथे सर्जन नसल्याने ओमवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य विजय जगताप यांनी दिली. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवाजी जगताप, सुभाष जगताप, संजय जगताप, लकी ढोकने, भीमराव जगताप, चंद्रशेखर जगताप, मंगेश ढोकणे व ग्रामस्थांनी केली आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four-year-old boy was injured in a leopard attack nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: