esakal | दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer nashik 1.jpg

शेतकऱ्यांकडून टरबूज खरेदी करत व्यापाऱ्याने पैस न देता धूळगावच्या दोन शेतकऱ्यांची लाखाची फसवणूक केल्याची घटना तालुक्यात घडली असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. 

दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला(जि.नाशिक) : शेतकऱ्यांकडून टरबूज खरेदी करत व्यापाऱ्याने पैस न देता धूळगावच्या दोन शेतकऱ्यांची लाखाची फसवणूक केल्याची घटना तालुक्यात घडली असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. 

टरबूज व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 
तालुक्यातील धुळगाव येथील शेतकरी प्रशांत गायकवाड व प्रतीक गायकवाड या दोन टरबूज उत्पादकांनी आपल्या शेतातील टरबूज येवल्यातील व्यापारी सुरेंद्र सूर्यवंशी यांना विकले. व्यापारी सूर्यवंशी यांनी प्रशांत गायकवाड यांना या मोबदल्यात थोडे थोडे पैसे देत विश्‍वास संपादन करत त्यांना ७८ हजारांचा धनादेश दिला. श्री. गायकवाड यांनी हा धनादेश दोनदा बँकेत टाकला. मात्र तो न वटल्याने गायकवाड यांनी व्यापारी सूर्यवंशी यांच्याकडे पैशांची मागणी केली.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

द्राक्षे व्यवहारातही काही शेतकऱ्यांची फसवणूक

सूर्यवंशी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर गायकवाड यांनी सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यांसह प्रतीक गायकवाड यांचीही सूर्यवंशी यांनी २४ हजारांची फसवणूक केली. इतर खरेदी-विक्रीत धुळगाव व पाटोदा परिसरात द्राक्षे व्यवहारातही काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, तक्रार नोंदविण्यासासाठी आता ते पुढे येत आहेत. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

संपादन - ज्योती देवरे

go to top