खोटे धनादेश देऊन शेतजमीन विक्रीत फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा 

प्रमोद सावंत
Thursday, 8 October 2020

न्यायालयीन आदेशावरून फसवणुक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक/मालेगाव : जळगाव शिवारात पेट्रोलपंपाची डीलरशिप मिळावी, यासाठी सुरेश काळे या शेतकऱ्याच्या ४० आर जमिनीसाठी ४१ लाख ११ हजार किंमत ठरली असताना त्यांना फक्त तीन लाख ९० हजार रुपये देऊन उर्वरित रकमेचे खोटे धनादेश, खोटे करारनामे व हमीपत्र करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन आदेशावरून किशोर माने (रा. जळगाव) यांच्यासह चौघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

किशोर माने याने अन्य तिघा साथीदारांच्या मदतीने संगनमत करून फसवणूक केली. बँकेचे धनादेश देऊनही ते वठले नाहीत. अन्य संशयितांना नजीकचे क्षेत्र विकत घेण्यास सांगितले. त्यांनी दिलेले धनादेशही वठले नाहीत. संशयितांनी जमीन फुकटात हडपण्याचा प्रयत्न करून फसवणूक केल्याची तक्रार सुरेश काळे यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in sale of agricultural land by giving false checks nashik news

Tags
टॉपिकस
Topic Tags: