
बाजार समितीत फळभाज्याचा व्यापार करतात आणि शेतमाल हा मुंबई पाठवीत होते. त्यांचे मुंबई त जाणे येणे होते. त्यांना मधुमेहाचा त्रास वाढू लागल्याने शासकीय रुग्णालयात तपासणी साठी गेले असता त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.
नाशिक / म्हसरूळ : पालेभाज्या व फळभाज्या खरेदी-विक्रीच्या निमित्ताने नाशिक व मुंबईच्या बाजारात ये-जा करणाऱ्या भाजीपाला व्यापारी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो राहत असलेला पेठरोड परिसरातील भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 28 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
मुंबई कनेक्शन पडले महागात
नाशिक शहरासह जिल्हा भरातून बाजार समितीत पालेभाज्या व फळभाज्या ची आवक होते असते. या ठिकाणी शेतकरी, आडतदार, व्यापारी, हमाल मापारी येत असतात. सध्या जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून,पेठ रोड वरील राम नगर उद्यान जवळ राहणारे व बाजार समितीत फळभाज्याचा व्यापार करतात आणि शेतमाल हा मुंबई पाठवीत होते. त्यांचे मुंबईत जाणे येणे होते. त्यांना मधुमेहाचा त्रास वाढू लागल्याने शासकीय रुग्णालयात तपासणी साठी गेले असता त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.
शुक्रवार (ता.22) रोजी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, वैद्यकीय अधीक्षक विजय देवकर, अधिकारी व कर्मचारी यांनी परिसराची पाहणी करून कोरोना बाधित रुग्णाचे राहते घर व बाजूचे चार घरे प्रतिबंधित केले असून बाजार समितीत सोबत काम करणारे व सतत संपर्कात आलेले 28 जणांना वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे
हेही बघा > VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल