esakal | VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

army 1.jpg

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या भयंकर संकटाचा सामना करत आहे. तसेच या संकटात लढणाऱ्या योद्ध्यांचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. पण अशात भारतीय लष्करातील सैनिकांना सुद्धा या योध्दांचा अभिमान व कौतुक करावेसे वाटले..सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काय घडले तेव्हा पाहुया...

VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या भयंकर संकटाचा सामना करत आहे. तसेच या संकटात लढणाऱ्या योद्ध्यांचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. पण अशात भारतीय लष्करातील सैनिकांना सुद्धा या योध्दांचा अभिमान व कौतुक करावेसे वाटले..सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काय घडले तेव्हा पाहुया...

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

सैन्याचे अधिकारी कोरोनाच्या या संकट काळात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कामाचे कौतुक करतात. म्हणतात की, "आम्ही जवान तुम्हाला मिठाई भेट देणार आहे. हे तुमच्यासाठी गिफ्ट असून आम्हाला तुमचा अभिमान आहे.

भारतीय पोलिसांच्या चांगल्या कामाबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे.प्रत्येकजण कोरोनामुळे चिंतेत आहे. तुम्ही मात्र शांतपणे कर्तव्य बजावत आहेत. मग ते लोकांना रोखणं असो किंवा वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण असो." या कोरोना योद्ध्यांच्या कर्तव्याचे कौतुक केलं आणि त्यांना मिठाईसुद्धा दिली. इंडियन आर्मीतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी बिकानेर पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला होता. ज्यावर भरपूर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा