धक्कादायक प्रकार! "माझ्या वडिलांनी जिथे आत्महत्या केली.. त्याच पुलावर आहे मी" असे सांगत युवकाने केले असे

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

पंकजने त्याच्या मित्राला फोन केला आणि सांगितले की, माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती.. त्याच ठिकाणी मी आत्महत्या करेन, मी सध्या त्याच पुलावर आहे. मित्र म्हणाला. काही अडचण असल्यास मला सांग,..पण तरीही त्याला जे करायचे शेवटी तेच केले.

नाशिक / म्हसरूळ : पंकजने त्याच्या मित्राला फोन केला आणि सांगितले की, माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती.. त्याच ठिकाणी मी आत्महत्या करेन, मी सध्या त्याच पुलावर आहे. मित्र म्हणाला. काही अडचण असल्यास मला सांग,..पण तरीही त्याला जे करायचे शेवटी तेच केले.

असा घडला प्रकार
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील भगवती नगर येथील पंकज अनिल सोनवणे हा आपल्या आई समवेत राहत होता. वडीलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी ही पंकजवर होती. शनिवार (ता.२३) रोजी सकाळी सव्वा अकराच्या पंकजने त्यांचा मित्र दीपक आसाराम पाटील (वय २४, नंदनवन चौक, उत्तम नगर, सिडको) यास फोन केला आणि सांगितले की, माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती त्याच ठिकाणी मी आत्महत्या करेन, मी सध्या रामवाडी पुलावर आहे असे सांगितले. दीपकने तू आत्महत्या करू नको काही अडचण असल्यास मला सांग, परंतु आत्महत्या करू नको असे बोलला पंकजने फोन कट केला आणि पुलाहून उडी मारली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह पात्रातुन बाहेर काढला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही बघा > VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल

पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रामवाडी पुलावरून गोदापात्रात उडी मारून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार (ता. २३) रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. पंकज अनिल सोनवणे (वय २५), रा. भगवती नगर , सिडको) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide by jumping from Ramwadi bridge nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: