चोरांचा थक्क करणारा कारनामा! बनावट चावी वापरून चक्क "अशीही" चोरी...

manmad petrol theft.png
manmad petrol theft.png

नाशिक : पानेवाडी प्रकल्पातील इंडियन ऑइल कंपनीच्या इंधन भरलेल्या टॅंकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करताना पोलिसांनी दोघांना अटक केली. टॅंकरसह 32 लाख 11 हजारांचा माल जप्त केला. संबंधित जागामालकावरही गुन्हा दाखल केला आहे. 

चक्क टॅंकरमधून इंधनचोरी... 

पानेवाडी प्रकल्पातून इंडियन ऑइल कंपनीतून (एमएच 04, डीएस 0291) या क्रमांकाचा टॅंकर इंधन भरून बाहेर पडला. मात्र, इच्छित स्थळी न जाता हा टॅंकर कंपनीसमोरील व्यापारी संकुलाच्या पाठीमागे मैदानात उभा होता. टॅंकरमालक भाऊराव वाघ (वय 37, रा. बुधलवाडी), चालक आप्पा घुगे (38, रा. खादगाव) यांनी बनावट चावी वापरून टॅंकरमधून पेट्रोल-डिझेल काढत होते. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्या दोघांसह टॅंकर व इतर असा 32 लाख 11 हजार 452 रुपयांचे साहित्य जप्त केले. टॅंकरचालक, मालक आणि जागामालकावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, उपनिरीक्षक गणेश जांभळी, सुनील पवार, संदीप वनवे, मुदस्सर शेख, गौरव गांगुर्डे, बस्ते, चंदू मांजरे आदींनी केली. 

Submitted by Sakal_Nashik on Sat, 02/08/2020 - 09:51

Desktop Headline:

मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

Desktop Body: 

नाशिक : अतिश्रीमंत कुटुंब... आलिशान राहणीमान... अचानक कुटुंबातील एकुलता एक मुलाचा मृत्यू... घरात संशयाने व्यापलेली जागा यामुळे सासू-सासरे व सून-नातू यांच्यात वाढलेला विसंवाद यामुळे सामाजिक जबाबदारी विसरत सासू-सासरे व सून यांनी एकमेकांविरोधात थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या दोघांच्या तक्रारीची नोंद सातपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

अशी आहे कहाणी....

सातपूर औद्योगिक वसाहतीत नामवंत उद्योगपतीची सातपूर नाईस भागात प्लॉट नंबर 21 वर स्वतःची कंपनी व परिसरातच आलिशान बंगला. मुंबई येथेही कॉर्पोरेट ऑफिससह देशातील विदेशात व्यवसायाचे जाळे. त्यामुळे समाजात हाय प्रोफाइल व अतिश्रीमंत कुटुंब म्हणून ओळख. अतिशय कष्टाने आपला व्यवसाय वाढविला. त्यांना एक मुलगा व दोन मुली, असा परिवार. मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलाचंही थाटामाटात लग्न केलं. नंतर उद्योजक हे स्वतः मुंबई येथील कॉर्पोरेट ऑफिस बघत असल्याने ते मुलाकडे नाशिकचा कारभार सोपवून मुंबईला राहायला गेले. पण महिन्यातून चार वेळा ते मुलाकडे येत-जात होते. मुलालाही एक सुंदर मुलगा झाल्याने आनंदाने घर भरलेलं असल्याने अतिशय खेळीमेळीच्या संसार सुरू होता. एके दिवशी अचानक मुलाचा अपघातात मृत्यू झाला. या सुखाच्या संसाराला दृष्ट लागली. मुलाच्या अचानक जाण्याने हळूहळू परिस्थिती बदलत गेली.

टॅंकरसह 32 लाख 11 हजारांचा माल जप्त 

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत पेट्रोल, डिझेल चोरी करणाऱ्या 25 टॅंकर ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या 18 टॅंकरवर गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com