कोरोनाच्या संकटात 'असा' होणार गणेशोत्सव साजरा...वाचा सविस्तर

ganpati.jpg
ganpati.jpg

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीत होणाऱ्या गणेशोत्सावासाठी राज्य शासनाने शनिवारी (ता. 11) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात यंदा गणेशोत्सव मंडळांनी फक्त चार फुटापर्यंतचे गणेशमूर्ती बसवून २०२१ मध्ये माघी गणेशोत्सावेळी विर्सजन करण्याचे सुचविले आहे.

गणेश मंडळासाठी मार्गदर्शक सुचना जारी

गृह विभागाने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीत गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी (ता.11) गणेश मंडळासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या. त्यात मंडळासाठी ४ तर घरगुती उत्सवासाठी २ फुट गणेशमूर्ती बसविण्याची सुचना केली आहे. तसेच दरवर्षी अनंत चतुर्थीला होणारे विसर्जन टाळून शक्य असेल त्यांनी २०२१ मध्ये माघी गणेश उत्सवात विसर्जन करण्याचे आवाहन केले. गर्दीत विसर्जन टाळून त्याऐवजी शक्यतो परंपारीक मूर्तीऐवजी धातू, संगमरवराच्या मूर्तीच्या पूजन करावे. शाडूच्या पर्यावरणपूरक मुर्ती असल्यास त्यांचे शक्यतो घरीच विसर्जन करावे. 

अशी असावी सुविधा

गणेश मंडळानी जाहीरातीच्या प्रदर्शनामुळे भाविकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक सामाजिक संदेश प्रसारणाला प्राधान्य द्यावे. सांस्कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्य शिबीर, रक्तदान, कोरोना, डेंग्यु, मलेरिया, आजार प्रतिबंधकात्मक उपाय स्वच्छता उपक्रमाची जागृती करावी. उत्सव काळात आरती, पूजेसाठी भाविकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जावी. श्रीगणेश दर्शनाची अॉनलाईन इंटरनेट, केबल नेटवर्क किंवा बेवसाईटद्वारे सुविधा देण्याची व्यवस्था करावी. गणेश उत्सवाच्या मंडपात सॅनेटायझर, सुरक्षित अंतर ठेउन स्वच्छतेची सोय असावी.

तर तेथे नियम आधिक कडक

आधिकार स्थानिक स्तरावर गणेश मंडळाना उत्सवासाठी दरवर्षी पोलिस, जागेसाठी तेथील स्थानीक स्वराज्य संस्थांची परवानगी घ्यावी लागते. ते आधिकार यंदाही स्थानीक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहे. कोरोनाची त्या त्या वेळची स्थिती पाहून महापालिका, नगरपालिका, निर्णय घेउ शकणार आहे. त्यामुळे यंदा कदाचित ग्रीन-रेड झोन मध्ये राज्यभर परवानगीच्या नियमाबाबत एकवाक्यता नसणार ज्या भागात कोरोना बाधीत रुग्ण जास्त तेथे नियम आधिक कडक असेही सूत्र असू शकेल.  श्रीगणपती आगमन विसर्जनाच्या मिरवणूका काढू नयेत. पारंपारीक पध्दतीने घरीच आरती करुन विसर्जन स्थळी कमी वेळ थांबावे. आदी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com