esakal | नियम व अटींचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal.jpeg

गणपतीची बसविण्यासाठी गणपतीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट, घरगुतीसाठी दोन फूट असावी आणि मंडप उभारणीबाबतच्या सूचना शासनाकडून येतील त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच गणपती विसर्जनासाठी गर्दी न करता, कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले. 

नियम व अटींचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा - छगन भुजबळ

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : गणेशोत्सव साजरा करताना कोरोना आणि संसर्गजन्य परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना नियम व अटींचे पालन करून शांतता भंग न होता भक्तिभावाने साजरा करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. रविवारी (ता. 2) नियोजन सभागृहात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. 

काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी 

श्री. भुजबळ म्हणाले, की कोरोनाचा धोका कायम असून, रुग्ण वाढत असल्याने नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. लॉकडाउननंतर रुग्ण वाढत असल्याने काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. शहरात एकूण ७५० सार्वजनिक मंडळे, तर दीड लाखाहून घरगुती गणेश मंडळे असून, या सर्व मंडळांनी सहकार्याची भूमिका दाखविली आहे. गणपतीची बसविण्यासाठी गणपतीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट, घरगुतीसाठी दोन फूट असावी आणि मंडप उभारणीबाबतच्या सूचना शासनाकडून येतील त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच गणपती विसर्जनासाठी गर्दी न करता, कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

स्टॉल मोकळ्या जागेत लावण्याचे नियोजन

खासदार गोडसे म्हणाले, की रस्त्यावर स्टॉल न लावता मोकळ्या जागेत लावण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच प्रभागानुसार कृत्रिम तलाव करण्यात येऊन त्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत मांडल्या. तत्पूर्वी महापालिका व पोलिस विभागातर्फे गणेशोत्सव नियमाची माहिती देण्यात आली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ