गंगापूर-गिरणारे-हरसूल रस्त्यावर रोजचेच अपघात; वाहतुक यंत्रणेचे मात्र दुर्लक्षच

राम खुर्दल
Saturday, 3 October 2020

गंगापूर, कश्यप धरणाकडे मौजेसाठी येणाऱ्या भरधाव वेगाच्या चारचाकी, टोळक्यांचे दुचाकींचे ताफे. आदिवासी भागातील दुचाकीस्वारांचे वेगावर सुटलेले नियंत्रण, व्यसनी वाहन चालकांकडून होणारे अपघात याला कुठेही अटकाव होत नाही.

नाशिक : गंगापूर-गिरणारे-हरसूल या वाहतुकीच्या रस्त्यावर रोजचे अपघात घडत आहेत. कित्येकजण या अपघातात मृत्युमुखी पडले असून कित्येकजण जायबंदी झाले आहेत. भरगच्च प्रवासी वाहणारी अवैध वाहतूक, भरधाव वेगाने चालणाऱ्या चारचाकी, दुचाकी व मद्यपी वाहनचालकांमुळे हे अपघात घडत असून वाहतूक पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल नागरिकांत व्यक्त होत आहे.

हेही वाचा > लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

भरधाव वेगाने येणाऱ्या अवैध वाहतुकीवर यंत्रणेचे दुर्लक्ष

नाशिकपासून गंगापूर-गिरणारे हरसूलपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची सतत वर्दळ असते. या मुख्य मार्गावर रोजचेच होणारे अपघात चिंतेचा विषय आहे. गंगापूर, कश्यप धरणाकडे मौजेसाठी येणाऱ्या भरधाव वेगाच्या चारचाकी, टोळक्यांचे दुचाकींचे ताफे. आदिवासी भागातील दुचाकीस्वारांचे वेगावर सुटलेले नियंत्रण, व्यसनी वाहन चालकांकडून होणारे अपघात याला कुठेही अटकाव होत नाही. रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी हा मार्ग धोक्याचा बनला आहे. गंगापूर-गिरणारे दरम्यान रस्त्यावर खड्डे ही वाढले असून रस्त्याच्या दुतर्फा काटेरी वृक्षाच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत. तर गंगापूर, गोवर्धनसमोर मोकाट जनावरांचे ताफे गेल्या अनेक वर्षे रस्त्यावरच फिरत असतात. प्रसंगी बसून घेतात, रस्त्यावर धड पथदिप नसल्याने अपघात कायम आहेत. हा रस्ता वाहतुकीला धोका बनला असून याकडे पोलीस यंत्रणेने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangapur-Girnare-Harsul road speeding illegal traffic system neglect nashik marathi news