esakal | दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

roshan aaher.png

एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा होत असतानाच क्षणार्धात त्या आनंदावर विरजण पडले. अचानक गावात शोककळा पसरली. कारण त्याच दिवशी भावाची अंत्ययात्रा निघाली होती. दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हळहळले.

दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

sakal_logo
By
सुदाम गाडेकर

नगरसूल (नाशिक) : एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा होत असतानाच क्षणार्धात त्या आनंदावर विरजण पडले. अचानक गावात शोककळा पसरली. कारण त्याच दिवशी भावाची अंत्ययात्रा निघाली होती. दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हळहळले.

एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

रेंडाळे (ता. येवला) येथे सुनील आहेर राजस्थानमध्ये सैन्यदलात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ते गावी आले होते. त्यांची मुलगी सोनाक्षी ( वय.१०) हिचा मंगळवारी वाढदिवस असल्याने कार्यक्रमाची तयारी असतानाच रोशन व त्याचा चुलत भाऊ यश वस्तीच्या शेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या कडेला खेळायला गेले होते तेथे अचानक तोल गेल्यामुळे रोशन सुनील आहेर (वय १३)  मंगळवारी (ता. ८) पाण्यात बुडाला.

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

एक तासाच्या अथक परिश्रमानंतर रोशनचा मृतदेह मिळाला

याबाबत यशने धावत येऊन कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर जवळपास एक तासाच्या अथक परिश्रमानंतर रोशनचा मृतदेह स्थानिक तरुणांनी शोधून काढला. बहिणीच्या वाढदिवशीच एकुलत्या भावाचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नगरसूल पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. मुलीच्या वाढदिवसाची घरात तयारी सुरु होती , सर्व नातेवाईकही जमा झाले होते.अन् क्षणात सगळ्याच्या आनंदावर विरजण पडलं आणि होत्याचं नव्हतं झालं..

हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

go to top