गुंड काय पोलिसांचे नातलग आहेत का? विश्वास नांगरे पाटलांनी केली चांगलीच कानउघडणी

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 10 June 2020

विश्वास नांगरे पाटडील म्हणाले, गुंड पोलिसांचे नातलग आहेत का? गुंडांना वठणीवर पोलिसांनी नाही आणायचे तर कोणी आणायचे, असे सवाल करीत, त्याच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवून एमपीआयडी कायद्यान्वये कारवाई करा आणि तडीपारीचा प्रस्ताव करून आयुक्तालयाकडे सादर करा, असे आदेश दिले. 

नाशिक,: कॅनॉल रोडवरील आम्रपालीनगरमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याने संशयित गुंडाने चाकूने वार केलेल्या व्यक्तीची पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी (ता. 9) भेट घेतली. संशयित गुंडाविरोधात ठार करण्याचा गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा करीत गुंडांना पाठीशी घालता आहात का, असा थेट प्रश्‍न करीत उपनगरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची त्यांनी कानउघाडणी केली. दोन दिवसांत संशयित गुंडाविरोधात "एमपीआयडी'अन्वये कारवाई करीत त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्याची तंबीही दिली. 

गुंड काय पोलिसांचे नातलग आहेत का?
आम्रपालीनगरमधील रहिवासी बाळासाहेब गुडेकर (30) यांच्यावर रविवारी (ता. 7) संशयित गुंड दत्ता हिरोडे याने चाकूहल्ला केला होता. हिरोडे व त्याचे तीन साथीदार गुडेकर यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात दारू पीत होते. त्या वेळी गुडेकर यांनी संशयितांना त्या ठिकाणी दारू पिण्यास मनाई केली. त्यावरून संशयिताने त्यांच्या हातावर, पोटावर चाकूने गंभीर वार केले. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे गुडेकर यांनी तक्रार केल्याने त्याची दखल घेत त्यांनी गुडेकर यांची पाहणी केली. त्यांच्या पोटावरील आणि हातावरील गंभीर जखम पाहून त्यांनी तत्काळ उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहोकले यांना संपर्क साधला.

हेहा वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

पोलिस आयुक्‍तांकडून उपनगर निरीक्षकांची कानउघाडणी 

संशयित गुंड हिरोडेविरोधात भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा का दाखल केला नाही, याची विचारणा केली. गुंड पोलिसांचे नातलग आहेत का? गुंडांना वठणीवर पोलिसांनी नाही आणायचे तर कोणी आणायचे, असे सवाल करीत, त्याच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवून एमपीआयडी कायद्यान्वये कारवाई करा आणि तडीपारीचा प्रस्ताव करून आयुक्तालयाकडे सादर करा, असे आदेश दिले. 

हेहा वाचा > नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gave an understanding of Sub-Inspector by Commissioner of Police nashik marathi news