"चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

malegaon 123.jpg
malegaon 123.jpg

नाशिक / मालेगाव : मालेगाव हे कष्टाळू नागरिकांचे गाव. लॉकडाउनमुळे त्यांना घरात थांबावे लागले. त्याचाही परिणाम संसर्ग वाढण्यात झाला. यंत्रमाग सुरू झाले अन्‌ चमत्कार वाटावा असा बदल घडला. संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या मालेगाव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होता. पण नेमके असे काय झाले की सर्वांनाच आश्चर्य झालयं. यावर आता प्रशासकीय यंत्रणा व वैद्यक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्याचे विश्‍लेषण केले जात आहे. 
 

चमत्कार वाटावा असे मालेगावात नेमके काय घडले! 
असे नेमके काय घडले, की अचानक शहरवासीयांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढली. पूर्व भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या जाणकारांच्या मते, रमजानचे उपवास, उन्हामुळे बाहेर पडण्यावर आलेल्या मर्यादा, आरोग्याबाबत जनजागृती, ऍलोपॅथी-होमिओ व युनानी या सर्व उपचारपद्धतींचा समन्वय, काही घरगुती उपचार व कोरोना विषाणूबद्दल कमी झालेली भीती यामुळे हे शक्‍य झाले. मालेगाव हे कष्टाळू नागरिकांचे गाव. लॉकडाउनमुळे त्यांना घरात थांबावे लागले. त्याचाही परिणाम संसर्ग वाढण्यात झाला. यंत्रमाग सुरू झाले अन्‌ चमत्कार वाटावा असा बदल घडला. 

...हे तर नव्याने हॉटस्पॉट बनले 
काहींच्या मते सर्वदूर फैलावामुळे हर्ड इम्युनिटी किंवा समूह प्रतिकारशक्‍ती तयार झाली व त्यामुळे विषाणू काहीसा कमजोर झाला. असे असले तरी धोका अजून टळलेला नाही. विशेषत: अतिजोखमीचे रुग्ण, लहान मुले व वृद्धांना सांभाळणे, त्यांना बाधा न होऊ देणे व अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे. 
अर्थात, कागदोपत्री सारे काही आलबेल दिसत असले तरी मालेगाव शहर एका भयंकर अनुभवातून गेले आहे. नागरिकांनी वैद्यकीय उपचारात काही जुगाड केले. काहींना लागण होऊन ते बरेही झाले, मात्र स्वॅब दिले गेले नसल्याने अशा रुग्णांची नोंद झाली नाही. तरुण वयोगटातील असे अनेक रुग्ण बरे झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. गेल्या 15 दिवसांत पूर्वेच्या तुलनेत पश्‍चिम भागातील रुग्णांची संख्या वाढली. मालेगावात सध्या 83 ऍक्‍टिव्ह पेशंट आहेत. त्यात पश्‍चिम भागातील 90 टक्के रुग्णांचा समावेश आहे. पश्‍चिमेकडील संगमेश्‍वर, कॅम्प, श्रीरामनगर, सोयगाव, भायगाव नववसाहत यासह द्याने परिसरात रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. संगमेश्‍वर व द्याने हे तर नव्याने हॉटस्पॉट बनले आहेत. 

हर्ड इम्युनिटी निर्माण झाली, प्रतिकारशक्ती वाढली की कोरोना विषाणू कमजोर झाला

संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या मालेगाव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक किमान पूर्व भागात तरी आटोक्‍यात आला आहे. या मुस्लिमबहुल भागात रुग्णांची संख्या व मृत्यूचा आलेख कमी झाल्याचे सुखद आश्‍चर्य घडले तरी कसे यावर आता प्रशासकीय यंत्रणा व वैद्यक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्याचे विश्‍लेषण केले जात आहे. 


आयेशानगर कब्रस्तान 
1 ते 7 मे : 61 
1 ते 7 जून : 26 

जूनमध्ये मृतांची संख्या 20 टक्‍क्‍यांवर 
मालेगावबाबत अधिक दिलासादायक बाब ही की एप्रिल व मे महिन्यांमध्ये कोविड-19 बाधित रुग्णांशिवाय मृत्यूचे वाढलेले प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत दोन्ही कब्रस्तानांमध्ये दफन केलेल्या मृतांची संख्या संख्या 197 होती. त्या तुलनेत जूनच्या पहिल्या सात दिवसांत अवघे 40 दफनविधी झाले. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मृतांची संख्या 20 टक्‍क्‍यांवर आली. बडा कब्रस्तानमधील अशी आहे मे व जूनमधील पहिल्या सात दिवसांची तुलनात्मक आकडेवारी ः 

मे महिन्यातील पहिले सात दिवस. 
1 ः 26 
2 ः 27 
3 ः 26 
4 ः 28 
5 ः 34 
6 ः 26 
7 ः 30 
----- 
एकूण ः 240 
------- 
जूनमधील पहिले सात दिवस 
1 ः 4 
2 ः 5 
3 ः 5 
4 ः 3 
5 ः 6 
6 ः 12 
7 ः 5 
--------- 
एकूण ः 40 
------------------- 

मे महिन्याच्या प्रारंभी विषाणूची पोटेन्सी जास्त होती. रुग्णांना उपचाराची संधीच मिळत नव्हती. 48 ते 72 तासांतच ते दगावत होते. आता कोरोना विषाणू काहीसा कमजोर झाला आहे. स्थानिक डॉक्‍टरांसह घरी उपचारामुळे स्वॅब तपासणीचे प्रमाण घटले. रोगप्रतिकारशक्ती वाढली असली, तरी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे ही काळजी घ्यावीच लागेल. हाय रिस्क पेशंट व अन्य आजार असलेल्यांकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. -डॉ. सईद फरानी, शल्यविशारद, मालेगाव 

लक्षात न येता काही जण बरे

कष्टाच्या कामांमुळे मालेगावकरांची सर्वसाधारण प्रतिकारशक्ती चांगली आहे. रमजानचे उपवास व उन्हामुळे बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या. स्थानिक डॉक्‍टरांचे उपचार मिळाले. जोडीला मालेगावचा वैद्यकीय उपचाराचा जुगाड होता. अर्सेनिक अल्बम-30, मन्सुराचा युनानी काढा व अन्य औषधी घेतली. लागण होऊन लक्षात न येता काही जण बरे झाले. -डॉ. परवेज फैजी प्रमुख सहाय्यक, कोविड सेंटर, बालरोगतज्ज्ञ, मालेगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com