मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देणाऱ्या मुख्याधिकाऱ्याची मागविली माहिती; कागदपत्र तपासणीनंतर पुढील कारवाई

विनोद बेदरकर
Tuesday, 29 September 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमलेले रवींद्र शिंदे यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याच्या कारणावरून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याबाबत पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कागदपत्रे मागविली आहेत. 

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमलेले रवींद्र शिंदे यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याच्या कारणावरून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याबाबत पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कागदपत्रे मागविली आहेत. 

झेडपीच्या अतिरिक्त मुख्याधिकाऱ्याची मागविली माहिती 
जिल्हा परिषदेने शिंदे यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाचे क्षेत्रीय स्तरावर समन्वयक म्हणूनही शिंदे यांच्यावर जबाबदारी आहे. जागतिक आपत्ती कोरोना महामारीच्या काळात शिंदे यांनी वारंवार त्यांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यावरून प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. माझे कुटुंब-माझी जबाबदारी या कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत खोटी माहिती देऊन शिंदे यांनी प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यांनी मुदतीत खुलासा न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कागदपत्र तपासणीनंतर पुढील कारवाई
गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून, शिंदे यांना बजावलेल्या नोटिसा, त्यांनी जिल्हा प्रशासनास दिलेली माहिती तसेच एकूण हलगर्जी झाल्याची कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली आहेत. कागदपत्र तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gave wrong information from ZP Officer nashik marathi news