esakal | जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही
sakal

बोलून बातमी शोधा

blind owl 1.jpg

कोरोना काळात एक घुबड जखमी होऊन पडल्याचे समोरील व्यक्ती सांगत होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या लॉकडाउनमध्ये श्रुती त्या घुबडाला वाचविण्यासाठी गेली. त्यानंतर...

जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही

sakal_logo
By
आनंद बोरा

नाशिक : कोरोना काळात एक घुबड जखमी होऊन पडल्याचे समोरील व्यक्ती सांगत होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या लॉकडाउनमध्ये श्रुती त्या घुबडाला वाचविण्यासाठी गेली. त्यानंतर...

'घुबी' या गव्हाणी घुबडाची एक अनोखी कथा

घुबी या गव्हाणी घुबडाची एक अनोखी कथा आहे. २ मे २०२० ला नाशिक रोड परिसरातून श्रुतीला माहिती मिळाली. एक घुबड जखमी होऊन पडल्याचे समोरील व्यक्ती सांगत होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या लॉकडाउनमध्ये श्रुती त्या घुबडाला वाचविण्यासाठी गेली. त्या जखमी घुबडाला घरी घेऊन आली. पूर्ण निरीक्षण केल्यावर ते घुबडाचे साधारण दोन महिन्यांचे पिल्लू असल्याचे दिसून आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी श्रुती त्याला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांच्याकडे घेऊन गेली. तपासणी केल्यावर ते घुबड जन्मतः अंध असल्याचे निष्पन्न झाले. अंध घुबड निसर्गात जगू शकत नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी श्रुतीने घेतली. त्याचे नामकरण घुबी करण्यात आले.

ते अशुभ कसे असेल???अंधश्रद्धेमुळे घुबडांची संख्या होतेय कमी

घुबी निसर्गात उडू शकणार नाही, पण या घरात तिला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. घरातील प्रत्येक सदस्य घुबीची काळजी घेतो. तिचे आजोबा डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे नातीच्या नवीन पाहुण्याची काळजी घेतात. डोळे नसताना घुबी घरात पूर्णपात्रे परिवाराच्या नजरेने विश्व बघत आहे. श्रुतीची आजी ॲड. शशिप्रभा यांच्या डोक्यावर जाऊन विविध आवाज काढणारी घबी सर्वांसमवेत रमते. घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. लक्ष्मी देवीचे वाहन म्हणून त्याचा सन्मान आहे. मग ते अशुभ कसे असेल, असा प्रश्‍न श्रुती उपस्थित करते. 

श्रुतीचे प्रेम वाखाणण्याजोगे

नाशिक रोडच्या शिवाजीनगर भागातील राजस बंगल्यामध्ये गेल्यावर स्वागताला घुबड दिसते. घुबी त्याचे नाव. घुबी जन्मतः अंध आहे. आठ महिन्यांपासून श्रुती पूर्णपात्रे ही महाविद्यालयीन तरुणी शरण संस्थेतर्फे जखमी पक्षी-प्राण्यांची सेवा करतेय. त्यात घुबीचा समावेश आहे. अंधश्रद्धेमुळे घुबडांची संख्या कमी होत असताना पक्ष्यांवरील श्रुतीचे प्रेम वाखाणण्याजोगे आहे. तिच्या घरात घार, श्‍वान, ससे बघावयास मिळतात. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

कोणताही अंध पक्षी निसर्गात जगूच शकत नाही. ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. या घुबडाचे दोन्ही डोळे नाहीत. पूर्ण अंध असताना श्रुतीने त्याला नवीन जीवन दिले आहे. अशा घटना खूपच क्वचित घडतात. -डॉ. संजय गायकवाड, उपायुक्त, पशुसंवर्धन 

माझ्या नातीने घुबीला घरी आणल्यापासून आम्ही रोज मस्ती करतो. माझे काका चाळीसगाव येथील डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनी त्या काळी पाळलेल्या सोनाली सिंहिणीची आठवण ताजी झाली. सोनाली हे पुस्तक त्या काळी प्रसिद्ध झाले होते. आता पक्षी, वन्यप्राणी पाळण्याची परंपरा श्रुतीने कायम ठेवली आहे. -डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, श्रुतीचे आजोबा  
 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा 

go to top