ह्रदयद्रावक! "तुम्ही पुढे चला..मी मागून येते" पण मागे विद्यार्थीनीची जीवनयात्राच संपली होती..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

नववीच्या वर्गात शिक्षण घेत आसलेल्या सविता गोपाळ शिद (वय 14) ही मुलगी मकरसंक्रांतीला मुरंबी ता.इगतपुरी येथे आई वडिलांकडे गेली होती. सुट्टी संपल्यावर आपल्या लहान बहिणीसोबत आई, काकासोबत आश्रमशाळेत  जाण्यासाठी मंगळवार (ता. 21) जानेवारीला निघाली होती. जेव्हा आश्रमशाळा एक ते दिड कि.मी.दूर राहिली असता "तुम्ही पुढे चला मी मागून येते" असे सांगुन मागे राहीली. बराच वेळ झाला तरीही ती आली नव्हती. सोबत असलेले नातेवाईक तिला पाहण्यासाठी गेले असता...

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील शेणवड खु|| आश्रम शाळेतील मुलीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मकर संक्रांतीची सुट्टी संपल्याने पुढील शिक्षणासाठी ती लहान बहीण, आई, व काकासोबत आश्रमशाळेत जात असताना ही घटना घडली.

"तुम्ही पुढे चला मी मागून येते" ​अशी घडली घटना...

नववीच्या वर्गात शिक्षण घेत आसलेल्या सविता गोपाळ शिद (वय 14) ही मुलगी मकरसंक्रांतीला मुरंबी ता.इगतपुरी येथे आई वडिलांकडे गेली होती. सुट्टी संपल्यावर आपल्या लहान बहिणीसोबत आई, काकासोबत आश्रमशाळेत  जाण्यासाठी मंगळवार (ता. 21) जानेवारीला निघाली होती. जेव्हा आश्रमशाळा एक ते दिड कि.मी.दूर राहिली असता "तुम्ही पुढे चला मी मागून येते" असे सांगुन मागे राहीली. बराच वेळ झाला तरीही ती आली नव्हती. सोबत असलेले नातेवाईक तिला पाहण्यासाठी गेले असता झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती दिसली.

हेही वाचा > नाशिक महापालिकेला शिस्त लावणारे तुकाराम मुंढे आता फडणवीसांच्या होमग्राऊंडमध्ये....राज्यात चर्चा

अकस्मात मृत्युची नोद

माहिती मिळताच शेणवड.खु|| चे सरपंच बापु वारघडे, आश्रमशाळा मुख्याध्यापक एच. जी आव्हाड, पोलीस पाटील रमेश बांगर, यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, हवालदार सोमनाथ बोराडे, जी.एस. परदेशी, विनोद चौधरी, महिला पोलीस मनीषा मथुरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालय नाशिक यथे पाठविण्यात आला असून. वाडीव-हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद करण्यात आली आहे, अधिक तपास वाडीवऱ्हे पोलीस करीत आहे.

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl student suicide at Igatpuri Ashram School Nashik Marathi News