नाशिक महापालिकेला शिस्त लावणारे तुकाराम मुंढे आता फडणवीसांच्या होमग्राऊंडमध्ये....राज्यात चर्चा

tukaram mundhe.jpg
tukaram mundhe.jpg

नाशिक : नाशिक महापालिकेला अलिकडच्या काळात शिस्त लावणाऱ्या आयुक्तांत के. बी. भोगे आणि तुकाराम मुंढे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नाशिकला स्मार्ट सिटी, मेट्रो व महसुलवाढीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांची नाशिकला नियुक्ती केली होती. आता मुंढे देवेंद्र फडणवीस यांच्या होम महापालिका नागपूरचे आयुक्त झाले आहेत. स्वतः तुकाराम मुंढे यांना नाशिक महापालिकेत भाजपच्या राजकीय नेत्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याची परतफेड होते की काय याची सध्या जोरात चर्चा आहे. 

नाशिकमध्ये असताना मुढेंची शिस्त

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. नागरिक तुकाराम मुंढेंच्या कामाचं नेहमीच कौतुक करतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. पण राजकारण्यांना त्यांचं एवढं वावडं का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.
तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त असतांना त्यांनी महापालिकेच्या कामाला शिस्त आणत कोट्यावधी रुपयांची बचत केली. मात्र भाजप नगरसेवकांना ते आवडले नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक त्यांची बदली केली. 

नाशिक महापालिकेत भाजपच्या राजकीय नेत्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न

नगरसेवकांचा कामकाजातील हस्तक्षेप बंद करण्याबरोबरच कोणत्याही नेत्याचे नियमबाह्य काम होत नव्हते. एरव्ही अदृष्य असणारे सफाई क्रमाचारी पहाटेच रस्त्यावर काम करतांना दिसत होते. मात्र भाजपच्या नगरसेवकांना हे पसंत पडले नाही. नगरसेवक, शहरातील आमदारांनी आयुक्त मुंढे यांच्या विरोधात मोहिम उघडली. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रालयात बदली केली. तेथेही संबंधित मंत्र्यांनी त्यांना कार्यभार न देता ताटकळत ठेवले होते. या सर्व राजकीय त्रासांनतर देखील शिस्तबध्द मुंडे यांनी याबाबत तक्रार केली नव्हती. मात्र आता त्यांची बदली थेट देवेंद्र फडणवीस व भाजपची एकहाती सत्ता असलेल्या नागपुर महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे. या शहरातील मेट्रो, महापालिकेच्या कामकाजासह हिवाळी अधिवेशनात विविध मंत्र्यांनी तक्रारी केल्या होत्या. याआधी स्वतः देवेंद्र फडणवीसच राज्याचे प्रमुख होते. त्यामुळे त्याचा फारसा गाजावाजा होऊ शकला नाही असे बोलले जाते. त्यामुळे भाजपने नाशिकला दिलेला त्रास अन्‌ फडणवीसांनी केलेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार का? याची राज्यभर चर्चा सुरु आहे.

राजकीय बुद्धीबळात मुंढेच्या निमित्ताने विरोधकांचा वजीरच अडचणीत

आता खुद्द तुकाराम मुंढे यांच्या हाती महापालिकेची सुत्रे गेली आहेत. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे नवे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारवर फडणवीस सातत्याने टिका करीत आहेत. या राजकीय बुद्धीबळात मुंडेंच्या निमित्ताने विरोधकांचा वजीरच अडचणीत येईल अशी ही खेळी असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com