श्रावणात खळखळून वाहणाऱ्या 'गोदावरीचे' लोभस रूप यंदा नाशिककरांना पाहावेना; पावसाअभावी गटारगंगा

दत्ता जाधव
Tuesday, 11 August 2020

पावसाळ्यात त्यातही श्रावणात खळखळून वाहणाऱ्या गोदावरीचे लोभस रूप यंदा नाशिककरांना पाहावेना, असे झाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत महापुरासह तीन लहान पूर अनुभवलेल्या याच गोदावरीला या वर्षी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. नदीपात्र प्रवाही नसल्याने नदीची अवस्था गटारगंगेसारखी झाली आहे. 

नाशिक / पंचवटी : पावसाळ्यात त्यातही श्रावणात खळखळून वाहणाऱ्या गोदावरीचे लोभस रूप यंदा नाशिककरांना पाहावेना, असे झाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत महापुरासह तीन लहान पूर अनुभवलेल्या याच गोदावरीला या वर्षी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. नदीपात्र प्रवाही नसल्याने नदीची अवस्था गटारगंगेसारखी झाली आहे. 

पावसाअभावी गटारगंगेचे स्वरूप 

२०१९ ला सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला नाही. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहातही समाधानकारक साठा नसल्याने गेल्या वर्षी नाशिककरांपुढे पाणीटंचाईचे संकट होते. परंतु ३१ जुलैला सुरू झालेला दमदार पाऊस पुढील चार दिवस कोसळत राहिल्याने गंगापूर धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाला. गंगापूर धरणातून गोदापात्रात ४५ हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी सोडल्याने ४ ऑगस्टला गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेला होता. त्या वेळी नेहरू चौक, सोमवार पेठ, दिल्ली दरवाजा, नवा दरवाजा, सराफ बाजार, कापड बाजार, पंचवटी भागातील सरदार चौक या भागांत गोदावरीचे पाणी पसरले. तेव्हा कन्नमवार व अहिल्यादेवी होळकर हे दोन पूल वगळता अन्य सर्वच पूल पाण्याखाली गेले होते. 

श्रावणात गटारगंगा 
सध्या गंगापूरसह कश्‍यपी, गौतमी धरणसमूहात जेमतेम ५०-५२ टक्के साठा आहे. पुढील काळात पाऊस न झाल्यास हेच पाणी वर्षभर पुरविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. श्रावणात गोदावरीची अवस्था अक्षरशः गटारगंगेसारखी झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोदाकाठावर फक्त श्राद्धादी विधींसाठी नागरिक येतात. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

आतापर्यंतचे महापूर 
गोदावरीला ९ सप्टेंबर १९६९ मध्ये महापूर आला होता. त्या वेळी गोदावरीचे पाणी थेट गुलालवाडी व्यायामशाळेपर्यंत पोचले होते. त्यानंतर तब्बल ३९ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये पुन्हा महापूर आला होता. २०१६ मध्येही महापूर आला होता. २०१९ ला तब्बल पन्नास वर्षांनी गोदावरीचे पाणी शहराच्या सखल भागात पसरले होते. ४ ऑगस्ट २०१९ ला गोदावरीला महापूर आला होता. 

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

धरणातून झालेला विसर्ग 

वर्ष एकूण पाऊस पाण्याचा विसर्ग 
१९-०९-२००८ गंगापूर- २०० मिमि ४२०५७ क्यूसेस (दुपारी ३ ते ४) 
त्र्यंबक- १४५ मिमि 
०२-०८-२०१६ गंगापूर- ४४३ मिमि ४२,६४२ (सायंकाळी ५ ते रात्री १०) 
त्र्यंबक- २३० मिमि 
०४-०८-२०१९ गंगापूर- २०२ मिमि ४५,४८६ (दुपारी १ ते रात्री ९) 
त्र्यंबक- ३९६ मिमि 

संपादन- मनीष कुलकर्णी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Godavari river is dry this year due to lack of rain nashik marathi news