esakal | पोलिसांचा फिटनेस कळणार थेट कंट्रोल रूमला?...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

goki watch2.jpg

पोलिसांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्याची स्वत:लाही कल्पना असावी, यासाठी "गोकी'ची घड्याळे शहर पोलिसांच्या मनगटी आले. याच घड्याळाच्या माध्यमातून पोलिसांच्या आरोग्याची थेट माहिती शहर पोलिस नियंत्रण कक्षात संकलित होणार आहे. 

पोलिसांचा फिटनेस कळणार थेट कंट्रोल रूमला?...वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा संसर्ग त्यात नित्याची ड्यूटी, आपल्या बांधवांना संसर्ग झाल्याच्या माहितीने मनात भीती...पोलिसांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्याची स्वत:लाही कल्पना असावी, यासाठी "गोकी'ची घड्याळे शहर पोलिसांच्या मनगटी आले. याच घड्याळाच्या माध्यमातून पोलिसांच्या आरोग्याची थेट माहिती शहर पोलिस नियंत्रण कक्षात संकलित होणार आहे. 

नियंत्रण कक्षात डॅश बोर्ड

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे- पाटील, दातार कॅन्सर जेनेटिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजन दातार, स्नेहा दातार, गोकी कंपनीचे विश्‍वास गुंडल, सचिन जंगेल यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात गोकी टेक्‍नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे बसविण्यात आलेल्या डॅश बोर्डचे उद्‌घाटन झाले. अभिनेता अक्षय कुमार आणि दातार जेनेटिक्‍सतर्फे शहर पोलिसांसाठी गोकीचे मनगटी घड्याळ प्रदान करण्यात आले. आयुक्तालयातील तीन हजार 132 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हाती हे घड्याळ आले. यामुळे पोलिस आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली शारीरिक तापमान, रक्तदाबाची माहिती प्रत्येकाला मिळत आहे. तसेच, किती व्यायाम केला, किती चालणे झाले, झोप किती झाली, कॅलेरीज किती गेल्या, यामुळे शारीरिक क्षमता आणि स्वास्थ्याची माहिती मिळत आहे. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याची हीच आरोग्याची माहिती थेट शहर पोलिस नियंत्रण कक्षालाही मिळणार आहे. त्यासाठीच "गोकी'च्या टेक्‍नॉलॉजीतून नियंत्रण कक्षात डॅश बोर्ड बसविण्यात आला आहे. उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, विजय खरात यांच्यासह सहाय्यक आयुक्त, पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

आरोग्याची निगा राखणाऱ्यास रिवॉर्ड 

गोकी या मनगटी घड्याळात असलेल्या फिटनेस ऍपनुसार जे पोलिस अधिकारी-कर्मचारी आरोग्य सुदृढतेचे ध्येय पूर्ण करतील आणि त्यामध्ये सातत्या राखतील, अशा पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गोकी कंपनीकडून रिवॉर्ड पॉइंटची सुविधा देण्यात आली आहे.  

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश

go to top