शतपावली करतानाच ओरबाडले सौभाग्याचे लेणे; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबादास शिंदे
Wednesday, 18 November 2020

रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शतपावली करत असताना समोरून अचानक काळ्या रंगाच्या दुचाकी गाडीवर एक इसम आला. आणि मग...

नाशिक रोड : रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शतपावली करत असताना समोरून अचानक काळ्या रंगाच्या दुचाकी गाडीवर एक इसम आला. आणि मग...

शतपावली करतानाच आला समोर..काय घडले नेमके वाचा...​

याबाबात मानसी मनोहर जोशी (52) या आपल्या दोन बहिणी समवेत जेलरोड परिसरातील ढिकले नगर, कॅनल रोड या ठिकाणी सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शतपावली करत असताना समोरून अचानक काळ्या रंगाच्या दुचाकी गाडीवर एक इसम आला व त्याने जोशी यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून गाडी जोरात पळून नेली रस्त्यावर गर्दी् नसल्याने सदरचा चोरटा गाडी वेगात घेऊन गेला दरम्यान या महिलांनी आरडाओरड केली परंतु चोरटा हा फरार झाला याप्रकरणी जोशी यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जेलरोड, ढिकले परिसरात रस्त्याने शतपावली करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकी गाडी वर आलेल्या चोरट्याने ओरबडून देण्याचा प्रकार घडला याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold Mangalsutra snatching nashik road marathi news