नाशिकमध्ये लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.. 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या धोरणानुसार नाशिकमध्येही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात हे महाविद्यालय सुरू करण्यात येईल. त्यासाठी नाशिकमधील जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित करणे आवश्‍यक असून, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय हस्तांतरण करार करण्यात येईल.

नाशिक : नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरू केले जाणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. बुधवारी (ता. 12) मुंबईमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर यासंदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी दिली. 
 

पालकमंत्री छगन भुजबळ : आरोग्य विद्यापीठ आवारात होणार सुरवात 
भुजबळ म्हणाले, की प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या धोरणानुसार नाशिकमध्येही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात हे महाविद्यालय सुरू करण्यात येईल. त्यासाठी नाशिकमधील जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित करणे आवश्‍यक असून, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय हस्तांतरण करार करण्यात येईल. या शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू केले जातील. 

मंत्रिमंडळापुढे लवकरच प्रस्ताव 
आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरपी शाखेचे अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठातर्फे सुरू केले जातील. शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Medical College in Nashik soon said Chhagan Bhujbal Nashik Marathi news