''लॉन्स अन्‌ मंगल कार्यालयातील लग्नाच्या मागणीबद्दल सरकार सकारात्मक निर्णय घेईल''

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

शारीरिक अंतर आणि आरोग्यविषयक उपाययोजना करत 50 जणांच्या उपस्थितीत लग्नाला मान्यता मिळावी, या मागणीबद्दल सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. 29) दिली.

नाशिक : लॉकडाउनमध्ये लॉन्स व मंगल कार्यालयात लग्नासाठी बंधन घालण्यात आले आहे. मात्र शारीरिक अंतर आणि आरोग्यविषयक उपाययोजना करत 50 जणांच्या उपस्थितीत लग्नाला मान्यता मिळावी, या मागणीबद्दल सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. 29) दिली.

कलम 144 मध्ये काही प्रमाणात शिथिलता

नाशिक मंगल कार्यालय-लॉन्स व हॉल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सरकारी आदेशानुसार लग्नासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी श्री. भुजबळ यांच्याकडे केली. या वेळी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, असोसिएशनचे पदाधिकारी सुनील चोपडा, संदीप काकड, समाधान जेजूरकर, हेमंत निमसे आदी उपस्थित होते. असोसिएशनतर्फे श्री. भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की सरकारने कलम 144 मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. लग्नासाठी 50 लोकांना जमण्यास परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या घरात अथवा सोसायटीच्या परिसरात लग्न करत आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! मैत्रीला नकार देताच युवकाकडून अमानुष प्रकार

मात्र कोरोनाचे संक्रमण होण्याच्या भीतीने परिसरातील नागरिक तक्रार करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विधींना अडचणी येत आहेत. शहरातील अनेक फार्महाउस, तसेच हॉटेलमध्ये लग्नकार्य पार पडत आहेत. त्याप्रमाणे सरकारच्या सर्व अटी-शर्थींचे पालन करून मंगल कार्यालय आणि लॉन्समध्ये लग्नासाठी परवानगी मिळावी, असे नमूद केले आहे.  

हेही वाचा > मोडून पडला 'संसार' तरी, मोडला नाही कणा...हो 'त्यांनी' करुन दाखवलं...एकदा वाचाच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government will take a positive decision on the demand for marriages in lawns and offices nashik marathi news