मोडून पडला 'संसार' तरी, मोडला नाही कणा...हो 'त्यांनी' करुन दाखवलं...एकदा वाचाच

raswanti2.jpg
raswanti2.jpg

नाशिक : मोडून पडला "संसार' तरी, मोडला नाही कणा...पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा...हो त्यांनी संकटाशी दोन हात करत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती खऱ्या करुन दाखवल्या. माणसाला जगण्यासाठी परिस्थितीच शिकवत असते. अनेक वेळा कठीण प्रसंग येवूनही त्यावर जिद्दीने मात करीत जीवन संघर्ष करणारा हा कारागीर...

मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह

पंचवीस-तीस वर्षापुर्वी लातूरहुन कचरु पोट भरण्यासाठी काम शोधत नाशिकला आला, नाशिकला आल्यावर गवंडीकाम, बिगारी किंवा मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करु लागला. पत्नी गयाबाईची साथ होतीच. पुढे त्यांना ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम ही अपत्ये झाली. बिगारी काम करीत असतानाच दगड, माती, विटा उचलल्याने कचरुच्या पोटाचे दुखणं सुरु झालं. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु झाले. आतड्यांचे मोठ ऑपरेशन करावं लागलं त्यातुनही कचरु बरा झाला. तेव्हापासुन त्याला अवजड व कष्टाची कामं करणं जमेना, त्याला उदनिर्वाह करण्याचे साधनच नव्हते. एक दिवस त्यानं रिक्षा घेण्याचे ठरवले रिक्षा घेतली. काही दिवस चालवली तो ही धंदा बंद पडला. 

रिक्षाची झाली रसवंती... 

मग त्या रिक्षात बदल करुन त्यावर अहमदनगरहुन आणलेला उसाचा लाकडी चरखा बसवला. त्याला एंजिनही जोडले आणि केली रसवंती तयार. दररोज तिनशे ते चारशे रुपये रसवंती पासुन मिळतात. शहरातील गर्दीच्या रस्त्याच्या कडेला जाऊन रिक्षा थांबवली जाते. ताज्या उसाचा रस 10 व 15 रुपयास ग्लास याप्रमाणे विकला जातो. त्यापासुन दररोज त्याला उदर निर्वाहापुरते पैसे मिळतात. शिवाय मोठा मुलगा ज्ञानेश्‍वर त्याला माऊली टोपन नावने हाक मारली जाते. तोही चार पैसे कमवु लागला आहे. धाकटा तुकाराम मॉलमध्ये कामाला जातो. तिघे जण कमवते झाल्याने सद्या हे कुटूंब समाधानी आहे. 

आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. भयाणक परिस्थिती ओढवली पण कधीच डगमगलो नाही. त्यावर मात करीत आजपर्यत जीवन प्रवास करत आहे. पत्नी गयाबाई, दोन मुले यांचीपण चांगली साथ आहे. आमचे या रसवंतीवर व्यवस्थित पोट चालते. - कचरु पालटे, रसवंती चालक.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com