esakal | राज्यपाल महोदय.. एक राजभवन नाशिकलाही बांधावे! राज्यपालांच्या उपस्थितीत भुजबळांची खास शैलीत टोलेबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Koshyari-Bhujbal.jpg

राज्यपाल महोदय..आपण नाशिकलाही एक राजभवन बांधावे म्हणजे आपल्या येथे येण्याने विकासकामेही लवकरात लवकर मार्गी लागतील. असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिला. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमातीचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यपाल महोदय.. एक राजभवन नाशिकलाही बांधावे! राज्यपालांच्या उपस्थितीत भुजबळांची खास शैलीत टोलेबाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यपाल महोदय..आपण नाशिकलाही एक राजभवन बांधावे म्हणजे आपल्या येथे येण्याने विकासकामेही लवकरात लवकर मार्गी लागतील. असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिला. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमातीचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. राज्यपालांच्या उपस्थितीत होणार्‍या सोहळयात उपस्थित महाविकास आघाडीचे मंत्री काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत जोरदार टोलेबाजी केली.

टोला लगावताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

नाशिक ही धार्मिक, सांस्कृती नगरी आहे. येथील वातवरणही आरोग्यदायी आहे त्यामुळे आपण नाशिकमध्येच एक राजभवन बांधले तर आपली आणि आमची वारंवार भेटही होत राहील असे भुजबळ यावेळी राज्यापालांना म्हणाले. आरोग्य विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोतच परंतु आता विद्यापीठ प्रशासनानेही याकरीता पुढाकार घेउन विषय मार्गी लावावेत असेही भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना राज्यपालांनी ‘तेव्हा आपणही आमच्या सोबत असायला हवे’ असा टोला लगावला. यावर भुजबळांनी आम्ही तर सोबत राहूच’ असा टोला लगावताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

go to top