मृत्यूपश्चात अवयवदान केलेल्या वडिलांना 'ओंकार'कडून अनोखी आदरांजली...एकदा वाचाच

अरुण मलाणी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

वडिलांचा अपघाती मृत्यू अन्‌ त्यांनी अवयवदान केल्यानंतर कुटुंबावर आलेल्या संकटाला धीराने तोंड देत वाटचाल करणाऱ्या त्यांच्या मुलाने दहावीत उत्तुंग कामगिरी केली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के मिळवून मुलाने वडिलांना आदरांजली वाहिली आहे. 

नाशिक : वडिलांचा अपघाती मृत्यू अन्‌ त्यांनी अवयवदान केल्यानंतर कुटुंबावर आलेल्या संकटाला धीराने तोंड देत वाटचाल करणाऱ्या त्यांच्या मुलाने दहावीत उत्तुंग कामगिरी केली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के मिळवून मुलाने वडिलांना आदरांजली वाहिली आहे. 

ओंकारकडून वडिलांना आदरांजली 

जुलै २०१७ मध्ये अश्‍विन झळके यांचा अपघात झाला होता. या अपघातानंतर अश्‍विन झळके यांचा मेंदू मृत घोषित केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर झळके कुटुंबीयांनी अवयवदानाचा  निर्णय घेतला होता. त्यामुळे एअर ग्रीन कॉरिडोअरसह ग्रीन कॉरिडोअरद्वारे विविध शहरांतील सात रुग्‍णांना जीवदान मिळाले होते. परंतु, अश्‍विन झळके यांच्‍यावर अवलंबून असलेल्‍या  झळके कुटुंबीयांच्‍या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा परिस्‍थितीत `सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्‍यानंतर झळके कुटुंबीयांना सामाजिक पाठबळ मिळाले होते. अभ्यासात  हुशार असलेल्‍या ओंकारने परिस्‍थितीची जाणीव ठेवत नाशिक रोडच्‍या पुरुषोत्तम इंग्‍लिश स्‍कूलमधून शिक्षण घेताना ९१.४० टक्‍के गुण मिळविले आहेत. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

ओंकारच्या कामगिरीचे कौतुक 

झळके कुटुंबीयांनी अवयवदानाच्‍या घेतलेल्‍या उदात्त निर्णयामुळे सात रुग्‍णांना जीवदान मिळाले. अत्‍यंत हलाकीच्‍या परिस्‍थितीत अश्‍विन झळके यांच्‍या कुटुंबीयांनी बिकट परिस्‍थितीला  तोंड देत वाटचाल सुरू ठेवली. मुलगा ओंकारने दहावीत यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great success in adverse conditions; Tribute to father from Omkar nashik marathi news